... या कारणामुळे मदर तेरेसा आजीवन राहिल्या अविवाहित?

आजही प्रत्येकजण मदर तेरेसा यांचं नाव तितक्याच आदराने आणि आपुलकीने घेतले जाते. आजही त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनामनात आहेत. मानवतेसाठी अगणित कार्य करणाऱ्या मदर तेरेसा आपल्या ध्येयावर कायम राहिल्या. पण आजही अनेकांना त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय का घेतलायाबाबत कल्पना नाही. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 28, 2024, 06:26 PM IST
... या कारणामुळे मदर तेरेसा आजीवन राहिल्या अविवाहित? title=

मदर तेरेसा म्हटलं की, डोळ्यासमोर एक अशी मुर्ती उभी राहते. निळ्या रंगाची बॉर्डर असलेली पांढरी साडी परिधान केलेली एक सात्किव स्त्री. जेव्हा लोक मदर तेरेसा यांच्या नावाचा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील दयाळूपणा आणि त्यांच्या चेहऱ्यावर सौम्य भाव जाणवतो.आई म्हणून संबोधले, तेव्हा त्यांना खरोखरच आपुलकीची भावना अनुभवता आली.

मानवतेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या मदर तेरेसा यांच्याबद्दल लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडत होता की, त्यांनी लग्नाचा विचार का केला नाही? या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच मिळेल जेव्हा बोयाजीयू कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी, वयाच्या 12 व्या वर्षी, प्रार्थनेसाठी गेली.

जेव्हा मदर तेरेसा लहान होत्या तेव्हा त्यांचा अध्यात्म आणि सामाजिक कल्याणाकडे कल वाढू लागला. प्रार्थनेपासून ते इतर सर्व गोष्टींमध्ये मदर तेरेसा खूप गुंतलेल्या होत्या. 15 ऑगस्ट 1928 रोजी जेव्हा 12 वर्षांची एनीस व्हिटिनातील ब्लॅक मॅडोना श्राइनमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेल्या तेव्हात त्यांनी ठरवलं की, मी बंगालमधील इतर मिशनऱ्यांप्रमाणे काम करेल.

आपल्या निर्णयावर ठाम राहून, वयाच्या 18 व्या वर्षी एनीसने घर सोडले. त्यांनी सिस्टर्स ऑफ लोरेटोकडून इंग्रजी शिकले. 1929 मध्ये त्या भारतात आल्या, दार्जिलिंगमध्ये राहून त्यांनी शाळेत शिकवायला सुरुवात केली आणि बंगाली भाषा देखील शिकली.

1931 मध्ये त्यांनी पहिले धार्मिक व्रत घेतले. यानंतर त्यांनी स्वत:साठी तेरेसा हे स्पॅनिश नाव निवडले, जे नन थेरेसे ऑफ लिसेक्सच्या नावाने प्रेरित होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी मानवतेसाठी स्वत:ला झोकून देण्याचे व्रत घेतलेला माणूस इतर सामान्य स्त्रीप्रमाणे स्वतःचा संसार सुरू करण्याचा विचार कसा करू शकतो? गरीब, दुःखी आणि आजारी लोकांना कशा मदत करु शकतात तेव्हा त्याचं उत्तर शोधण्यात तेरेसा नेहमी व्यस्त होत्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मिशनला समर्पित असलेल्या मदर टेरेसा यांना वाटले की, जर ती लग्न किंवा स्वतःचे कुटुंब सुरू करण्यामध्ये अडकली तर तिचं लक्ष विचलित होऊ शकते. त्याच्यासाठी फक्त एकच नातं महत्त्वाचं होतं आणि ते म्हणजे देवासोबतचं नातं.