Gujarat Election Result 2022 LIVE Vote Counting : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला होती. मात्र भाजपने आघाडी घेतली आहे. तर विरोधी पक्ष म्हणून गेल्या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे या निवडणुकीत किती जागा मिळवणार याची उत्सुकता आहे.
8 Dec 2022, 10:48 वाजता
गुजरातमध्ये भाजप - 147 , काँग्रेस - 20 तर आप - 9
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. भाजपच्या आकड्यात घट झालेय. 150 वरुन आता 147 आकडा झालाय. तर आपच्या जागेत वाढ होताना दिसत आहे. आप - 9 तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य 4 जागांवर आघाडीवर आहेत.
8 Dec 2022, 10:37 वाजता
हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर आघाडीवर
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत विरमगाम मतदारसंघातून भाजप उमेदवार हार्दिक पटेल 3099 मतांनी आघाडीवर आहे. गांधीनगर दक्षिण मतदारसंघात पाच फेऱ्यांनंतर भाजपचे अल्पेश ठाकोर 4130 मतांनी आघाडीवर आहेत.
8 Dec 2022, 10:28 वाजता
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 150 जागांवर तर काँग्रेस 18 ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर आप 6 जागांवर पुढे आहे. तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
8 Dec 2022, 10:11 वाजता
गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2022 LIVE । Gujarat Election Result 2022
8 Dec 2022, 10:10 वाजता
क्रिकेटर जडेजाची पत्नी रिवाबा 8671 मतांनी आघाडीवर
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून दुसऱ्या फेरीनंतर भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) या 8671 मतांनी आघाडीवर आहेत.
8 Dec 2022, 10:09 वाजता
सुरत, राजकोट आणि गांधीनगरमध्ये भाजप पुढे
Gujarat Election Result : गुजरातमधील सुरतमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) 16 पैकी 14 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय राजकोटच्या सर्व 8 जागांवर भाजपने आघाडी घेतली असून गांधीनगरच्या सर्व 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे.
8 Dec 2022, 09:52 वाजता
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 145 जागांवर तर काँग्रेस 24 ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर आप 9 जागांवर पुढे आहे. तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
8 Dec 2022, 09:44 वाजता
Gujarat Election Result : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 13 हजार मतांनी आघाडीवर
गुजरात विधानसभा निवडणूक निकाल हाती येऊ लागले असून भारतीय जनता पक्षाला (BJP) बहुमत मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendrabhai Patel) दुसऱ्या फेरीअखेर 13000 मतांनी आघाडीवर आहेत.
8 Dec 2022, 09:36 वाजता
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) जामनगर उत्तर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. रिवाबा भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी आहे.
8 Dec 2022, 09:35 वाजता
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी (Isudan Garhvi) खंभलिया विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.