Budget Session 2023 LIVE : GDP वाढीचा दर पुढील वर्षासाठी 6.5 % राहण्याचा अंदाज

  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत मांडले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारी रोजी संपेल तर दुसरे सत्र 13 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे.

Budget Session 2023 LIVE :  GDP वाढीचा दर पुढील वर्षासाठी 6.5 % राहण्याचा अंदाज

Parliament Budget Session 2023 Updates :  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत (Economic Survey) मांडले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारी रोजी संपेल तर दुसरे सत्र 13 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे.

31 Jan 2023, 10:32 वाजता

Parliament Budget Session 2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.  सकाळी 10.30 वाजता ते प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. 

31 Jan 2023, 10:29 वाजता

Union Budget 2023 Updates :  संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पहिल्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल.संसदेत 35 प्रलंबित विधेयके आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ही यादी पटलावर ठेवण्यात येणार आहे. सरकारी नोंदीनुसार, 26 विधेयके सध्या राज्यसभेत आणि 9 लोकसभेत मंजूर होण्यासाठी प्रलंबित आहेत.

31 Jan 2023, 10:26 वाजता

Union Budget 2023 Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण आज मांडले जाणार आहे. (Economic Survey india) केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत मांडले जाईल.

31 Jan 2023, 10:21 वाजता

Parliament Budget Session 2023 Updates :  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत मांडले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारी रोजी संपेल तर दुसरा सत्र 13 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे. त्याआधी  केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत मांडले जाईल.