कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? 'आज संध्याकाळपर्यंत...', संजय राऊतांचं मोठं विधान

Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2024, 01:30 PM IST
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? 'आज संध्याकाळपर्यंत...', संजय राऊतांचं मोठं विधान title=
संजय राऊत

Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे लवकरच महायुतीचे सरकार सत्तेत येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने पुढील सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं आवश्यक असतं. त्यामुळेच शिंदेंनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास राजीनामा दिला. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबरच शिंदेंच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर, मंत्री दादा भुसेही उपस्थित होते. एकनाथ शिंदे हे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजपकडे स्वत:चं बहुमत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचा भाजपचा हक्क असल्याचे राऊत म्हणाले. आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे मोदी, शाह ठरवतील असे संजय राऊत म्हणाले. 

रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरुन हल्लाबोल

दरम्यान रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय..विरोधी पक्षांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

आमदारांकडून लिहून घेतली प्रतिज्ञापत्र 

गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत, ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलवत त्यांच्याकडून पाठिंब्याबाबतची प्रतिज्ञापत्र लिहून खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे या बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत आहे.ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात पक्षातील मुख्यनेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत.पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ताज लॅड्स येथे झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी गट नेता म्हणून एकमताने एकनाथ शिंदेंची निवड करत, सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे सोपवले. मात्र तरीही शिंदेकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेतभविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये याबाबत ही खबरदारी घेतली जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.