UP Election Results 2022 Live updates | भाजपा 271, सपा 123 जागा, निकालाचे LIVE UPDATE

UP Election Results 2022 Live updates : उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला... यूपीत पुन्हा योगीराज? की अखिलेशसिंह बाजी मारणार? यासंबधीच्या सर्व ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी ही लिंक रिफ्रेश करा

UP Election Results 2022 Live updates | भाजपा 271, सपा 123 जागा, निकालाचे LIVE UPDATE

मुंबई : उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला... यूपीत पुन्हा योगीराज? की अखिलेशसिंह बाजी मारणार? यासंबधीच्या सर्व ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी ही लिंक रिफ्रेश करा

10 Mar 2022, 11:34 वाजता

मतमोजणी केंद्रावर सपाच्या उमेदवाराचं धरणं
सीतापूरच्या हरगाव विधानसभेत सपा उमेदवार रामहेत भारती यांनी मतमोजणी केंद्राबाहेर धरणं धरत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. हरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश राही आघाडीवर आहेत.

10 Mar 2022, 11:17 वाजता

अयोध्येत भाजप चार जागांवर आघाडीवर
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एकूण 5 जागांपैकी भाजप चार जागांवर आघाडीवर आहे, तर सपा एका जागेवर आघाडीवर आहे. अयोध्येच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघातून सपा उमेदवार अभय सिंह 2600 मतांनी आघाडीवर असून भाजपच्या उमेदवार आरती तिवारी पिछाडीवर आहेत.

10 Mar 2022, 11:00 वाजता

अखिलेश सपा कार्यालयात पोहचले
उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणी सुरू असताना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लखनऊ येथील पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. 403 पैकी 389 जागांवर ट्रेंड आले आहेत आणि भाजप 270 जागांवर आघाडीवर आहे, तर सपा 103 जागांवर आघाडीवर आहे.

10 Mar 2022, 11:00 वाजता

उत्तर प्रदेशमध्ये शिवेसेनेचं काय झालं?
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेनं 60 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: युपीत जाऊन प्रचार केला होता. पण शिवसेनेला अद्याप खातंही खोलता आलेलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवारांना 0.02 टक्के म्हणजे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. नोटा पर्यायाला 0.71 टक्के मतं पडली आहेत.

10 Mar 2022, 10:50 वाजता

सीएम योगी 8363 मतांनी आघाडीवर आहेत
गोरखपूर सदर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या दोन टप्प्यांनंतर भाजपचे उमेदवार योगी आदित्यनाथ आघाडीवर असून त्यांना 10888 मते मिळाली आहेत, तर सपा उमेदवार सुभवती शुक्ला यांना 2525 मते, सीएम योगी 8363 मतांनी आघाडीवर आहेत.

10 Mar 2022, 10:40 वाजता

स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर कुशीनगरच्या फाजिलनगर विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार सुरेंद्र कुशवाह 4500 मतांनी आघाडीवर आहेत, तर सपा उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर आहेत.

10 Mar 2022, 10:18 वाजता

यूपीमध्ये भाजप 235 जागांवर पुढे 
उत्तर प्रदेशमध्ये 403 पैकी 344 जागांवर कल दिसून आला असून भारतीय जनता पक्षाने (BJP) 235 जागांवर आघाडी मिळवली आहे. समाजवादी पक्ष 100 जागांवर, बसपा 5 जागांवर आणि काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे.

10 Mar 2022, 10:08 वाजता

जसवंतनगर मतदारसंघातून शिवपाल यादव मागे 
जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार शिवपाल सिंह यादव निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार पिछाडीवर आहेत.

10 Mar 2022, 09:58 वाजता

यूपी भाजप कार्यालयात जल्लोष
उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे. भाजप 230 जागांवर आघाडीवर आहे, तर सपा 100 जागांवर आघाडीवर आहे.

10 Mar 2022, 09:56 वाजता