UP Election Results 2022 Live updates | भाजपा 271, सपा 123 जागा, निकालाचे LIVE UPDATE

UP Election Results 2022 Live updates : उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला... यूपीत पुन्हा योगीराज? की अखिलेशसिंह बाजी मारणार? यासंबधीच्या सर्व ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी ही लिंक रिफ्रेश करा

UP Election Results 2022 Live updates | भाजपा 271, सपा 123 जागा, निकालाचे LIVE UPDATE

मुंबई : उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला... यूपीत पुन्हा योगीराज? की अखिलेशसिंह बाजी मारणार? यासंबधीच्या सर्व ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी ही लिंक रिफ्रेश करा

10 Mar 2022, 09:51 वाजता

वाराणसीमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. शहर दक्षिणमधून भाजपचे नीळकंठ तिवारी, शहर उत्तरमधून रवींद्र जैस्वाल पुढे, कॅन्टमधून सौरभ श्रीवास्तव पुढे, सेवापुरीतून सुरेंद्र पटेल पुढे, शिवपूर विधानसभेतून अरविंद राजभर पुढे, त्रिभुवन राम अजगरामधून, अभय पटेल पुढे आहेत.

10 Mar 2022, 09:48 वाजता

रायबरेलीतून आदिती सिंह आघाडीवर
उत्तर प्रदेशातील रायबरेली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या अदिती सिंह आघाडीवर आहेत.

10 Mar 2022, 09:29 वाजता

उत्तर प्रदेशात 311 जागांचे ट्रेंड
उत्तर प्रदेशात 403 पैकी 250 जागांचे ट्रेंड समोर आले असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भजापने 200 चा आकडा पार केला आहे. भाजप 205 जागांवर आघाडीवर असून सपा 95 जागांवर आघाडीवर आहे. तर बसपा 7 आणि काँग्रेस 4 जागेवर आघाडीवर आहे.

10 Mar 2022, 09:20 वाजता

देवरियातून भाजप आघाडीवर
देवरिया सदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सलभमणि त्रिपाठी आघाडीवर आहेत.

10 Mar 2022, 09:14 वाजता

उत्तर प्रदेशात 250 जागांचे ट्रेंड
उत्तर प्रदेशात 403 पैकी 250 जागांचे ट्रेंड समोर आले असून भाजप आणि सपात जोरदार चुरस रंगली आहे.  भाजपने 152 जागांवर आघाडी घेतली आहे. त्याचवेळी सपा 93 जागांवर मुसंडी मारली आहे, तर बसपा 6 आणि काँग्रेस 3 जागेवर आघाडीवर आहे.

10 Mar 2022, 09:09 वाजता

मैनपुरी विधानसभेतून भाजप आघाडीवर
उत्तर प्रदेशच्या मैनपुरी विधानसभा जागेवर भाजपा आघाडीवर आहे, वाराणसीच्या कैंटधमधून सौरभ श्रीवास्तव पिछाडीवर

10 Mar 2022, 09:08 वाजता

मतमोजणीदरम्यान अखिलेश यादव यांचे ट्विट
मतमोजणी सुरू असताना सपाच्या अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे, 'निकाल अजून बाकी आहे, आता धैर्याची वेळ आहे,  मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि जाणीवपूर्वक कार्यरत राहिल्याबद्दल सपा-गठबंधनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्याचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 'लोकशाहीचे सैनिक' विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततात!'

10 Mar 2022, 08:49 वाजता

उत्तर प्रदेशात 200 जागांचे ट्रेंड
उत्तर प्रदेशात 403 पैकी 203 जागांचे ट्रेंड समोर आले असून भाजपने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. त्याचवेळी सपा 75 जागांवर आघाडीवर आहे, तर बसपा 2 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.

10 Mar 2022, 08:47 वाजता

कानपूर देहाट सिकंदरातून बसपा आघाडीवर
कानपूर देहाटच्या सिकंदरा विधानसभेतून बसपाचे उमेदवार लालजी शुक्ला आघाडीवर असून भाजपचे अजित पाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जालौनमध्ये मतपत्रिकांच्या मतमोजणीत तीनही जागांवर सपा पुढे आहे. 
तर मधौगढ काल्पी ओराईमध्येही सपा आघाडीवर आहे. 
कानपूरमधील मतपत्रिकांच्या मतमोजणीत बिथूरमधून भाजपचे अभिजित सिंग सांगा आघाडीवर आहेत. 
गाझियाबादमध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत शहर विधानसभा आणि साहिबााबाद विधानसभेच्या जागेवरून भाजप आघाडीवर आहे.

10 Mar 2022, 08:44 वाजता

भाजपची जोरदार मुसंडी
उत्तर प्रदेशमध्ये भाजपची जोरदार मुसंडी, 125 जागांवर आघाडीवर, समाजवादी पक्ष 75 जागांवर आघाडीवर. आतापर्यंत 403 जागांपैकी 203 जागांचे निकाल