मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 1 ठार तर 3 जखमी

 पनवेलनजीक (Panvel) मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात (Mumbai-Goa highway accident) झाला. 

Updated: Jan 20, 2021, 09:14 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 1 ठार तर 3 जखमी

अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यात पनवेलनजीक (Panvel) मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात (Mumbai-Goa highway accident) झाला. या अपघातात कारमधील 1 जण ठार तर 3 जखमी झालेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास तुरमाळे गावाजवळ हा अपघात झाला.

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर सँट्रो कारने पुढे चाललेल्या ट्रेलरला धडक दिली. या अपघातात कार त्यात अडकून पडली. अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.  महामार्ग पोलिसांनी तातडीने क्रेन ृच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.