प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : चिपूळणमध्ये (Chiplun Rain) गुरुवारच्या मध्य रात्रीपासून आलेल्या महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. संसार उद्धवस्त झाली. दरम्यान आता चिपूळणमधील पाणी ओसरले आहे. त्यामुळे चिपळूणची विदारक स्थिती उघड होत आहे. दरम्यान यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील अपरांत रुग्णालयाचा पुरामुळे संपर्क तुटला. वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे व्हेंटीलेटरवर असलेल्या 11 कोरोना रुग्णांचा (corona patients) दुर्देवीरित्या मृत्यू झाला. (11 corona patients died in the Covid Center at Aparant Hospital in Chiplun due to no connectivity due to heavy Rainfall and flood)
नक्की काय झालं?
पुराने शहराला विळखा घातला. विविध ठिकाणी पाणी जमा होऊ लागले. यासह अपरांत हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाणी शिरायला लागलं होतं. अपरांत रुग्णालयात 21 रुग्णांवर उपचार सुरु होते. यापैकी काही जणांना व्हेंटीलेटरवर होते. पावसाच्या वाढत्या जोरामुळे हॉस्पिटलचा वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात जनरेटर होतं. पण त्यातही पाणी शिरलं होतं. त्यामुळे या 11 जणांना जीवाला मुकावे लागले.
आज (23 जुलै) जसंजसं पाणी ओसरत आहेत तसे तिथली परिस्थिती पुढे येत आहे. यामध्ये रुग्णालयाची माहितीही समोर आली. यामध्ये 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली.
इतरावंर उपचार सुरु
दरम्यान उर्वरित 10 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या रुग्णांवर कामठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.