उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, तुम्ही छोटा स्टॉल अथवा ऊस गाड्यावर रस घेतला तर ...

GST on Sugarcane Juice :  आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल. पण...

Updated: Mar 31, 2023, 08:46 AM IST
उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, तुम्ही छोटा स्टॉल अथवा ऊस गाड्यावर रस घेतला तर ... title=

GST on Sugarcane Juice : उन्हाळात उसाचा रस घेतले तर छान वाटते. मात्र, आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल. त्यामुळे उसाच्या किमतीत वाढ होणार आहे. मात्र, तुम्ही रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेतला तर त्यासाठी हा जीएसटी असणार आहे का? राज्यात अनेक एसटी स्थानकात 'रसवंती'च्या नावाची छोटी दुकाने आहेत. (12 percent GST on Sugarcane Juice)

उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी 

राज्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. कारण सारख कारखान्यांना ऊस घातला जात आहे. राज्यात साखर आणि गुळाचे उत्पादन करण्यात येत आहे. असे असले तरी उसाचा रसही काढला जातो. तसेच उसाचा रस छोट्या छोट्या स्टॉलवर मिळत आहे. मात्र, उसाचा रस हे कृषी उत्पादन नाही.  त्यामुळे उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल,  असा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. त्यामुळे आता अडचण निर्माण झाली आहे. उसाच्या रसावर जीएसटी द्यावा लागणार आहे. परंतु छोट्या दुकानात रस घेतला तर त्यासाठी हा जीएसटी असणार नाही. त्यामुळे रसवंती किंवा उसाच्या गाड्यावर रस तुम्ही बिनधास्त प्या. कारण येथे तुम्हाला जीएसटी द्यावा लागणार नाही.

दरम्यान, व्यापारी तत्वावर उसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावर हा जीएसटी द्यावाच लागेल, असे उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने म्हटले आहे. कारण उसाचा रस हा कृषी उत्पनात मोडत नाही. त्यामुळे जीएसटीसाठी तो पात्र ठरतो. उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्स या कारखान्याने उसाचा रस व्यापारी तत्त्वावर विकण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे या रसावर जीएसटी लागू होईल का, याची अधिक माहिती घेण्यासाठी ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीकडे संपर्क केला. त्यावेळी ही बाब पुढे आली.

 गोविंद सागर मिल्स या कारखान्याने नोव्हेंबर 2022 मध्ये ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीकडे संपर्क साधला आणि माहिती विचारली. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला. उसाचा रस हा साखर कारखान्यात उसाचे गाळप करुन तयार केला जातो. तो शेतकरी तयार करत नाही. तसेच त्याचे स्वरुप आणि प्रक्रियाही बदलते. साखर, इथेनॉल तयार करण्यासाठी तो कच्चा माल ठरतो. त्यामुळे कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या तिन्ही अटींची पूर्तता यामध्ये होत नाही. त्यामुळे त्याच्यावर जीएसटी हा द्यावा लागेल.

ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीचे काम काय असते ?

तुम्ही एकादे उत्पादन घेण्याचा विचार करत आहात. या उत्पादनावर जीएसटी असेल की नाही याची माहिती जाणून घेता येते. मात्र, ही माहिती आपल्याला कशी मिळणार, असा प्रश्न असतो. मात्र, सरकारने जीएसटी कोणत्या वस्तू आणि सेवांसाठी लागू होतो, याची माहिती देण्यासाठी एक सुविधा उपलब्ध केली आहे. ही सुविधा म्हणजे ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटी होय. या सुविधेच्या माध्यमातून कशावर किती टक्के जीएसटी लागू होईल, हे उत्पादन किंवा उद्योग सुरु करण्याआधी जाणून घेता येते.

रस्त्यावर मिळणाऱ्या उसाच्या रसावर जीएसटी असेल का?

उसाच्या रसावर जीएसटी असणार असे वृत्त आल्यानंतर अनेकांना प्रश्न पडलाय. रस्त्यावर किंवा ऊसाचा रस विकणाऱ्या दुकानातील उसाच्या रसावर जीएसटी असणार का?  याचे उत्तर नाही असेच आहे. मात्र, तोच रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याच्या बिलात जीएसटी अंतर्भाव होऊ शकतो. येथे तसे असणार नाही.