12वीची परीक्षा वर्षातून दोनवेळा? आर्ट, कॉमर्स, सायन्स शाखाही नसणार?

लवकरच बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं तशी महत्त्वपूर्ण शिफारस केलीय... या समितीनं विद्यार्थी हितासाठी महत्त्वाचा अहवाल दिलाय

Updated: Apr 6, 2023, 10:40 PM IST
12वीची परीक्षा वर्षातून दोनवेळा? आर्ट, कॉमर्स, सायन्स शाखाही नसणार? title=

HSC Exam : तुमची मुलं पुढच्या एक-दोन वर्षांत बारावीची परीक्षा (12th Exam) देणार आहेत का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या बारावीची वार्षिक परीक्षा बोर्डामार्फत घेतली जाते. मात्र लवकरच बारावीच्या परीक्षा देखील सेमिस्टर पॅटर्ननुसार (Semester Pattern) वर्षातून दोन वेळा घेता येतील का, यादृष्टीनं विचार सुरू झालाय. केंद्र सरकारनं (Central Government) पाठ्यक्रमात सुधारणा करण्यासाठी एनसीएफ म्हणजे राष्ट्रीय पाठ्यक्रम मसुदा समिती नेमलीय... या समितीच्या अहवालात अनेक महत्वाच्या शिफारशी (Recommendations) करण्यात आल्यात.

तज्ज्ञ समितीने बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात नवा अभ्याक्रमाचा (Course) आराखडा तयार केला असून या अनुषंगाने शिफारसी मांडल्या आहेत. तज्ज्ञ समितीच्या शिफारसी मान्य झाल्यास बारावी परीक्षेचा पॅटर्नच बदलेल. 

12वीची परीक्षा वर्षातून दोनवेळा? 
12वीची परीक्षा वर्षातून दोनवेळा घ्यावी, अशी प्रमुख शिफारस आहे. सत्र 1 आणि सत्र 2 अशा दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे 12वीमध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा शाखा असू नयेत. आपल्या आवडीप्रमाणं विषय निवडून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, अशीही शिफारस करण्यात आलीय. या शिफारशींच्या मसुद्यावर लवकरच विद्यार्थी-पालकांची मते मागवली जातील आणि शिफारशींना मंजुरी मिळाल्यास CBSE, ICSE बोर्डापाठोपाठ राज्यातील HSC बोर्डातही या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येईल.

शिफारसीनुसार विद्यार्थ्याला बारावी बोर्ड परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांची कोर्स उपलब्ध असतील, त्यातून विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून बोर्ड परीक्षेला सामोरे जातील. या नव्या पॅटर्ननुसार बारावीची परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यास करावा लागेल.  वार्षिक परीक्षेइतकीच सहामाही परीक्षाही महत्त्वाची असेल. या दोन्ही परीक्षांचे गुण विचारात घेऊन पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित होतील. 

आता राज्य सरकार राज्य सरकार शिक्षण पद्धतीत कशा पद्धतीनं बदल करून निर्णय घेतं, हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे.