मुंबई : तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर डोळ्यात तेल घालून त्यांची काळजी घ्या. कारण महाराष्ट्रात (Maharashtra corona) एकट्या मार्च महिन्यात 15 हजार मुलांना कोरोनाने आपल्या जाळ्यात (15 thousand children tested corona positive in Maharashtra) ओढले आहे. चिंताजनक म्हणजे या सर्व मुलांचं वय हे 10 वर्षांखालील आहे.
दर 10 मुलांमागे 2 मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पालकांसाठी हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासूनच ज्येष्ठांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात येत आहे. मात्र आता लहान मुलांभोवतही कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. अनेक निर्बंध शिथिल झाल्याने लहान मुलांनाही घराबाहेर नेण्यात येत आहे, त्यामुळे आता त्यांनाही कोरोना होऊ लागला आहे.
मार्चमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढलेला आहे. दररोज 30-40 हजाराच्या घरात नवे कोरोनाग्रस्त सापडत आहेत. त्यात मार्चमध्ये 15 हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातील आकडेवारीनुसार :
काय काळजी घ्याल?