नालासोपाऱ्यात २० बॉम्बसह स्फोटकांचा साठा जप्त

या सर्व प्रकरणामध्ये सनातन संस्थेचाच हात असल्याचा थेट आरोप देखील केले जात आहेत.

Updated: Aug 11, 2018, 08:13 PM IST
 title=

प्रताप नाईक, झी मिडीया, कोल्हापूर : नालासोपा-यामध्ये 20 बॉम्बसह स्फोटकांचा मोठा साठा एस.आय.टीनं जप्त केलाय. या प्रकरणी एस.आय.टीनं तीन जणांना अटक केली असुन सनातन संस्था पुन्हा एकदा संशयाच्या भोव-यात सापडली आहे.  सनातन संस्थेनं याप्रकरणी आमचा काहीही संबध नाही, असं जाहीर केलं असले तर प्रत्येक घटनेमध्ये सनातनचं नाव का येतो हा  प्रश्न अनेकांना पडला आहे. इतकच नव्हे तर या सर्व प्रकरणामध्ये सनातन संस्थेचाच हात असल्याचा थेट आरोप देखील केले जात आहेत.

सनातनचा संबध 

विघातक कारवाया आणि सनातन संस्थेचा संबध असल्याचा आरोप वारंवार केला जातो... तपास यंत्रणांकडून सनातनच्या साधकांना अटक होऊनही संस्था मात्र आपला काहीही संबध नसल्याची अशी भुमीकाच घेत आलेली आहे. सनातन संस्थेचा साधक मलगोंडा पाटील याचा गोवा इथल्या मडगांव स्फोटात सहभाग असल्याचं तपास यंत्रणांनी जाहीर केलंय. मलगोंडाचा चुलत भाऊ रुद्रगोंडा पाटील फरार आहे. सनातनचा साधक प्रवीण लिमकरही मडगांव स्फोटानंतर फरार आहे. चौथा साधक समीर गायकवाडलाही कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक झाली होती. गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचं एसआयटीच्या तपासात उघड झालं. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सी.आय.डीनं सनातनच्या डॉ. विरेंद्र तावडे अटक केली. बॉम्बस्फोट आणि विचारवंताच्या हत्येमध्ये सनतनच असल्याचा आरोप होत असताना आणि तसे पुरावे  तपास यंत्रणाच्या हाती लागत असताना मात्र आपल्या साधकांना मुद्दाम गोवलं जात असल्याचा युक्तिवाद ही संघटना करत राहिली. आता नालासोपारा इथं 20 बॉम्बसह सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत आणि शरद कळसकर यांना अटक झालीये... या प्रकरणातही सनातनकडेच आरोपाचं बोट दाखवलं जातंय.

युवकांची माथी भडकवणं

सनातनवर अशा कारवायांचे आरोप होत असताना 'हिंदू जनजागृती समिती' आणि  सनातन संस्था ही एकच  असल्याचीही चर्चा आहे. एके काळी बजरंग दलाचं काम पहाणारे आणि ड़ॉ. दाभोळकर, पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकर यांनी सनातन युवकांची माथी भडकवत असल्याचा आरोप केलाय. नालासोपारा प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे, हे तपासात समोर येईलच. या निमित्तानं विघातक कारवायांमागे सनातन संस्थेचे साधक असल्याची चर्चा नव्यानं सुरु झाली आहे.