पुणे मॅरथॉन : कृत्रिम पायांच्या जोरावर 'तो' 5 कि.मीटर धावला

पुण्यातील बाबुराव सणस मैदाना जवळील पुतळ्यापासून मँरेथॉनला सुरवात झाली.

Updated: Dec 2, 2018, 10:24 AM IST
पुणे मॅरथॉन : कृत्रिम पायांच्या जोरावर 'तो' 5 कि.मीटर धावला  title=

पुणे : ३३ वी पुणे इंटरनॅशनल मँरेथॉन आज पार पडतीये. पुण्यातील बाबुराव सणस मैदाना जवळील पुतळ्यापासून मँरेथॉनला सुरवात झाली. पहाटे ५ वाजता काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांच्या हस्ते फ्लँग ऑफ होऊन ४२ किलोमीटरच्या पूर्ण मँरेथॉनला सुरवात झाली. पूर्ण  मॅरेथॉन बरोबरच २१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉन,  १० किलोमीटर रन,  ५ किलोमीटर, व्हिल चेअरमन रन अशा  वेगवेगळ्या टप्प्यात ही मॅरेथॉन पार पडतेय.

यंदा या स्पर्धेत एकून १५ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला असून यामध्ये १०२ परदेशी स्पर्धकांचाही सहभाग आहे. तर  ८ वर्षा नंतर पुन्हा एकदा महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनला यंदा सुरुवात झालीये.

नवा आदर्श 

अपघातात आपले पाय गमावलेल्या नागपूरच्या प्रशांत गौरकर यांनी कृत्रिम पायांच्या जोरावर ३३ व्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. यातील पाच किलोमीटर चा रन केवळ ४५ मिनिटात पुर्ण करत त्यांनी नवा आदर्श निर्माण केला.

विशेष म्हणजे ही मॅरेथॉन मधील अपंग खेळाडूंसाठी असलेल्या व्हिल चेअर रन मध्ये सहभागी न होता सर्वसामान्य खेळाडूं सोबत मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले.