वादळी वारे अन् उधाणलेला समुद्र; वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट उलटली, दोघांचा मृत्यू

Vengurla Boat Collapsed: वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले.तिघांनी पोहून किनारा गाठला तर चौघे अद्यापही बेपत्ता 

मानसी क्षीरसागर | Updated: May 24, 2024, 12:17 PM IST
वादळी वारे अन् उधाणलेला समुद्र; वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट उलटली, दोघांचा मृत्यू  title=
7 Sailors Drowned After Boat Capsized In Vengurle Port 2 died

Vengurla Boat Collapsed: वेंगुर्ला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले होते. त्यानंतर तिघांनी पोहून किनारा गाठला होता. तर, चौघे जण अद्यापही बेपत्ता होते. त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे अजूनही बेपत्ता आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचे वातावरण आहे. कोकणातही काही दिवसांपूर्वी पाऊस झाला होता. गुरुवारीही समुद्रात वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती होती. या वादळी वाऱ्यांमुळं या खलाशांची बोट समुद्रात उलटली होती. या बोटीत सहा खलाशी होते. त्यातील तिघे सुखरुप बचावले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला असून दोघा खलाशांचा शोध अद्याप सुरू आहे. आज सकाळी त्यांचे मृतदेह सापडले आहेत. 

वेंगुर्ले बंदरात जे मच्छिमार आहेत किंवा मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत त्यांना बर्फ लागतो. तो बर्फ घेऊन जाणारी जी बोट आहे ती वेंगुर्ले बंदराच्या अगदी मधोमध गेल्यानंतर उलटली. या बोटीत 7 जणं आहेत. त्यातील तिघांनी पोहत पोहत किनारा गाठला. तर, 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, दोन जण अद्याप बेपत्ता आहे. त्यांचा शोघ सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून वादळी वाऱ्याने पाऊस पडतोय. त्यामुळं या वादळी वाऱ्यामुळंबोट उलटल्याची माहिती समोर येतेय. जे खलाशी बेपत्ता आहेत त्यांचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.   

प्रवरा नदी पात्रातील सहावा मृतदेहही सापडला

अहमदनगर दुर्घटना प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. 22 तारखेला बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला असून बंधा-यापासून एक किमी अंतरावर सापडला मृतदेह. ठाणे आपत्कालीन दलाला मृतदेह सापडला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर सापडला मृतदेह. अर्जून जेडगुले 18 वर्षीय असं मयत तरुणाचे नाव आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे SDRF च्या 3 जवानांसह 3 तरूणांचा मृत्यू झाला आहे.  अकोले येथील घटनेत सहाजण दगावले असून सुगाव येथील नदीतील शोधमोहीम संपली.