रायगड - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारला अपघात

जखमींवर  एम.जी.एम. रूग्णालयात उपचार सुरू....    

Updated: Feb 14, 2020, 07:49 AM IST
रायगड - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारला अपघात

मुंबई : रायगड - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण जखमी झाले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. कारच्या या भीषण अपघातात दोन महिला तर एक पुरूष आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ एम.जी.एम. रूग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्तांची प्रकृती  स्थिर असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, असं  डॉक्टरांनी म्हटलं आहे. गुरूवारी रात्री पेण उड्डाणपूला जवळ हा अपघात झाला. उड्डनपूलाच्या दुतर्फा कठडे सुरक्षित नसल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला आहे. 

कल्याणहूण श्रीवर्धन येथे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा दुर्दैवी अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.