नाद खुळा ! लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? शेतकऱ्याने लावली 11 बुलेटची पैज

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपलंय मात्र यानंतरच्या चर्चा मात्र थांबताना दिसत नाही. कोण जिंकणार कोण हरणार यासाठी पैजेचे विडे ठेवले जाऊ लागले आहेत. 

Updated: May 21, 2024, 07:26 PM IST
नाद खुळा ! लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? शेतकऱ्याने लावली 11 बुलेटची पैज title=

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि अत्यंत महत्वाच्या टप्पा 20 मे रोजी पार पडला. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर  मतदान घेण्यात आले. महाराष्ट्रातील लढती सर्वात लक्षवेधी आहेत.  अनेक दिग्जांची प्रतिष्ठा पणाला लागाली आहे. आता सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे ते 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. निकालाआधीच कोण जिंकणार याची चर्चा देखील रंगली आहे. अशातच माढा लोकसभा मतदार संघात निवडणूक कोण जिंकणार यावरुन एका शेकऱ्याने  11 बुलेटची पैज लावली आहे.    

माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील जिंकल्यास 11 बुलेटची ही पैज लावण्यात आली आहे. निलेश पाटील या शेतक-याने ही अकरा बुलेटची पैज लावली आहे. ज्याला पैज लावायची आहे त्याचा उमेदवार निवडून आला तर निलेश पाटील त्याला बुलेट देणार आहेत. तुतारीवरचा उमेदवार निवडून आला तर पैज लावणा-याने पाटील यांना बुलेट द्यायची अशी ही पैज आहे.

कोण आहे 11 बुलेटची पैज लावणारा शेतकरी

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. शरद पवार यांच्या बद्दलची सहानभूती वाढली होती. शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून माढा तालुक्यातील बावी येथील निलेश पाटील या शेतकऱ्याने 11 बुलेटची पैज लावली आहे.

निलेश पाटील हे सहा एकर द्राक्ष बाग असलेले शेतकरी आहेत. शरद पवार यांनी वेळोवेळी फळबागांसाठी केलेल्या मदतीची जाणीव त्यांना आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे पाटील यांनी आता तुतारी चिन्हावर उभे राहिलेले मोहिते पाटील निवडून येणार असा दावा केला आहे. यासाठी त्यांनी चक्क 11 बुलेटची पैज लावलेली आहे ज्याला पैज लावायची आहे त्याचा उमेदवार निवडून आला तर त्याला बुलेट द्यायची आणि तुतारीवरचा उमेदवार निवडून आला तर त्यानं पाटील यांना बुलेट द्यायची असे या पैजेच्या विड्याचं स्वरूप आहे. 

या पैजेच्या विड्याला जाहीर करून अद्याप तीन दिवस झाले तरी कोणीही हा विडा उचललेला नाही. तीन जून पर्यंत कोणीही यावे आणि अकरा बुलेटची शर्यत लावावी असा आव्हान निलेश पाटील यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. त्यामुळे पैजेचा विडा लावण्यासाठी कोण पुढे येणार याकडे लक्ष लागले आहे