lok sabha election

माढाचा तिढा सुटता सुटेना! भाजपला बसणार पक्षांतर्गत वादाचा फटका

Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील पक्षांतर्गत मतभेद उफाळून आलेत. विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील घराण्यानं बंडाचं निशाण फडकवलंय.. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणाराय..

Mar 28, 2024, 09:40 PM IST

LokSabha: एक, दोन नव्हे तर तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाला आहे 'हा' उमेदवार

LokSabha: लोकसभा निवडणुकीत के पद्मराजन पुन्हा एकदा आपलं नशीब आजमवणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत 238 वेळा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 

 

Mar 28, 2024, 04:25 PM IST

महायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...

Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mar 28, 2024, 02:51 PM IST

उर्मिलावर केलेल्या 'सॉफ्ट पॉर्न' कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन, म्हणाली 'तिनं तिकीट मिळवण्यासाठी...'

Kangana Ranaut Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकवर केलेल्या कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन म्हणाली...

Mar 28, 2024, 12:47 PM IST

Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार; शिंदे गटानं अंतिम टप्प्यात चालली शेवटची चाल

Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच शिंदे गटानं शेवटची चाल चालली. दरम्यान, आता हा तिढा सुटणार असून, जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

 

Mar 28, 2024, 07:11 AM IST

माढा, अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी; संजय काकडे यांच्या पोस्टमुळे खळबळ

पुण्यातही भाजप उमेदवाराविरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर संजय काकडे नाराज झाले आहेत. समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भेट घेतली. 

Mar 27, 2024, 11:01 PM IST

ठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?

Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय. 

Mar 27, 2024, 07:45 PM IST

LokSabha: नवनीत राणांना 100 टक्के पाडणारच, बच्चू कडूंचा निर्धार; अडसूळ म्हणाले 'मीच विरोधात लढणार'

LokSabha: भाजपाने अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवनीत राणा यांच्या नावाला विरोध असतानाही भाजपाने तिकीट जाहीर करत मित्रपक्षांना सर्वांना धक्का दिला आहे. 

 

Mar 27, 2024, 07:27 PM IST

उदयनराजेंचं ठरलं! साताऱ्यातून निवडवणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले 'भाजपाच्या...'

LokSabha: उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेतून निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्याला जे काय सांगायचं आहे ते सांगितलं असल्याचं सांगत सूचक विधानही केलं आहे. 

 

Mar 27, 2024, 05:25 PM IST

'तुम्ही पाठिंबा दिलेले तुरुंगात...,' संजय निरुपमांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, 'ऑफर असणाऱ्यांनी विचार करावा'

LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा होऊ लागल्यानंतर महाविकास आघाडीमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते उघडपणे टीका करु लागले आहेत.

 

Mar 27, 2024, 04:43 PM IST

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे. 

Mar 27, 2024, 02:54 PM IST

लोकसभेआधी आघाडीत बिघाडी! सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव...काँग्रेसची स्बळाची तयारी?

Loksabha 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव निर्माण झालाय. सांगलीत ठाकरेंविरोधात काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mar 27, 2024, 02:03 PM IST

मविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?

Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 

Mar 26, 2024, 07:15 PM IST