Pune Crime : पुणे पाट्या, पुणे टोमणे दुपारची वामकुक्षी या मजेदार कारणांसह पुणेकर आणखी एका कारणामुळे चर्चेत असतात. पत्ता विचारणाऱ्या पुणेकरांना(Pune) अशा पद्धतीने पत्ता सांगतात की पत्ता विचारणारा हैराण होतो. आता मात्र पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्ता विचारल्याच्या रागातून एका ऑडी कारच्या मालकानं वकिलाच्या पायावर कार चढवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. स्टेटसला शोभत नसल्याचे म्हणत ऑडी कारच्या मालकानं वकिलासह अत्यंत हे धक्कादायक कृत्य केले आहे(Pune Crime ).
विशाल सोनवणे नावाचे असे तक्रारदार वकिलाचे नाव आहे. सोनावणे हे जंगली महाराज रस्त्यावर उभे होते. त्यांनी ऑडीमालकाला ज्ञानमुद्रा क्लासेसचा पत्ता विचारला. तू कुणाला पत्ता विचारतो? माझ्याकडे ऑडी आहे. पत्ता विचारून तू माझ्या स्टेटसला धक्का पोहचवतोयस, असं म्हणत ऑडीमालक(Audi Car Owner) वकिलासह(Lawyer) भांडायला लागला.
दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरु होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की, सोनवणेंच्या पायावर त्यानं ऑडी चढवली. जखमी सोनवणेंनी याप्रकरणी डेक्कन पोलीस विशाल जखमी झाले आणि त्यांना तात्काळ हॉस्पिटल गाठावं लागलं. याप्रकरणी विशाल यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी ऑडी चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यात कधी काय घडेल आणि पुणेकर (pune) कधी काय करतील हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी पुण्यात घडला होता. चिंचवडहून बालेवाडीला अशा पुणे परिवहन सेवेच्या बसमधूव प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला बस स्टॉपच्या आधीच उतरायचं होते. त्याने बस चालकाला बस थांबवण्याची विनंतीही केली. पण बस चालकाने त्याचं ऐकलं नाही. त्यांनी आपली बस सुरूच ठेवली. ड्रायव्हर बस थांबवत नसल्याने या प्रवाशाने भलतीच शक्कल लढवली. तो थेट ड्रायव्हरच्या केबीनजवळ गेला आणि त्याने ओरडायला सुरुवात केली. ये वाचवा… ये वाचवा… ड्रायव्हर राग देतोय… वाचवा….उतरु देत नाय… वाचवा… ओ वाचवा रे…. ड्रायव्हर किडनॅप करतोय…. असं तो जोरजोरात ओरडू लागला. या प्रवाशाचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता.