अटकेत असलेला गोंधळेकर 'शिवप्रतिष्ठान'शी संबंधित

 सुधनवा गोंधळेकर हा संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित असल्याचं पुढं आलंय.

Updated: Aug 10, 2018, 09:42 PM IST

मुंबई : अवैध शस्त्रसाठ्याप्रकरणी एटीएसनं अटक केलेला सुधनवा गोंधळेकर हा संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित असल्याचं पुढं आलंय. नालासोपाऱ्यातल्या वैभव राऊतपाठोपाठ एसटीएसनं आणखी दोघांना अटक केलीय.  शरद कळसकर याला नालासोपाऱ्यातून तर सुधनवा गोंधळेकर याला पुण्यातून अटक करण्यात आलीय. या तिघांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.शिवप्रतिष्ठानचे कोणतेही पद त्यांच्याकडे नसल्याचे शिवप्रतिष्ठानचे नितिन चौगुले यांनी सांगितले. 

शरदच्या घरातून काही बॉम्ब बनवण्याची कागदपत्रंही जप्त करण्यात आलीय. आगामी सणांच्या दिवसात घातपात करण्याचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

तिघांना अटक 

गोंधळेकर हा मुळचा साताऱ्यातील करंज पेठचा आहे.  एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिघांना अटक करण्यात आली असून अधिकचा तपास करून यामागचं तथ्य समोर येईल असं गृहराज्यामंत्री केसरकरांनी सांगितलंय.