अरुण गवळीचा नातीसोबतचा फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सध्या या फोटोची चांगलीच चर्चा दिसत आहे.

Updated: Jun 17, 2021, 11:19 PM IST
अरुण गवळीचा नातीसोबतचा फोटो व्हायरल

मुंबई : मुंबईच्या गुन्हेगारी विश्वामध्ये गॅंगस्टर अरुण गवळी 'डॅडी' म्हणून ओळखले जातात. त्याच्या बाबत आपण अनेक नकारात्मक बातम्या ऐकत असतो. पण डॅडी अरुण गवळीचा नवं रुप समोर आलं आहे. डॅडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये डॅडी आपल्या नातीला हातावर खेळवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या या फोटोची चांगलीच चर्चा दिसत आहे. अरुण गवळीचा जावई अभिनेता अक्षय वाघमारेने हा नाती-आज्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Actor Akshay Waghmare shares photo of gangster Arun Gawli playing with his grand daughter Purna on Instagram)

 
अरुण गवळी यांची मुलगी योगित गवळी आणि अक्षयला गेल्या महिन्यात कन्यारत्न प्राप्त झालं. कन्यारत्न झाल्याने दगडी चाळीत लक्ष्मीचं आगनम झालं. यामुळे संपूर्ण दगडी चाळीत आनंदाचं वातावरण होतं. या दोघांनी आपल्या लेकीचं पूर्णा असं नामकरण केलं आहे.  

 

अक्षय आणि योगिता गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले होते. या दोघांनी 8 मे 2020 ला सप्तपदी घेतल्या. लॉकडाऊन असल्याने मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. हा विवाहसोहळा भायखळ्यातील दगडी चाळीतच पार पडला होता.   

संबंधित बातम्या :

ज्या डॉक्टरांनी कोरोनातून बरं केलं, त्या डॉक्टरांना महिलेची खंडणीसाठी धमकी

'मास्क नाही तर उमेदवारी नाही', सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना खडसावले