कडोंमपाचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत निलंबीत

...

Updated: Jun 19, 2018, 02:34 PM IST
कडोंमपाचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत निलंबीत title=

कल्याण: कल्याण डोंबीवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत अखेर यांना अखेर निलंबीत करण्यात आलंय. महापालिकेचा आयुक्त गोविंद बोडके यांनी आज घरतला निलंबित केलं.  पोलीस  संजय घरतला सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. एखाद्या सरकारी कर्मचा-यास  ४८ तास पोलीस कोठडीत झाल्यास निलंबनाची कारवाई होते. मात्र, संजय घरत यांच्यावर कारवाईत दिरंगाई का करण्यात आली असा सवाल आता उपस्थित होत आहे. १३ जूनला एसीबीने घरतला अटक केली होती .  घरत ८ लाखाची लाच घेत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं होतं.

घरतकडून चौकशीत सहकार्य नाही

कल्याण डोंबिवली मनपाचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय. संजय घरत आपल्या दोन मोबाईलचा पासवर्ड एसीबीला देत नसल्याचं एसीबीने कोर्टात म्हटलंय. मोबाईलमध्ये घरतने काही महत्त्वाची कागदपत्र दडवली असल्याची शक्यता आहे. व्हॉईस सँपल आणि मोबाईल पासवर्ड या दोन मुद्द्यांवर एसीबीने घरतची पोलीस कोठडी मागितली, घरत आणि त्याच्या दोन साथीदारांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. चौथा आरोपी नारायण परूळेकरला २८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय.

८ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक 

संजय घरत यांना ८ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली होती. २७ गावातल्या एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी घरत यांनी ४२ लाखांची मागणी केली होती. या रक्कमेवर तडजोड होऊन ३५ लाख रूपये देण्याचं ठरलं होतं. मात्र तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचेतला पहिला ८ लाखांचा हफ्ता स्वीकारताना घरत अलगद जाळ्या सापडले. घरत यांच्या कार्यालयातल्या दोन लिपीकांचीही या प्रकरणी चौकशी सुरू आहे. घरत यांच्या याआधीही अनेक प्रकरणात चौकशी सुरू आहेत.