Balya Singer Died : प्रसिद्ध आदिवासी गायक बाळा रतन दिवे यांचा मृत्यू

बाळ्या सिंगर 'आग पोरी तू स्वप्नात ये ना'  (aga pori tu sapnat yena) या गाण्यामुळे घराघरात पोहचला.

Updated: Oct 28, 2022, 06:34 PM IST
Balya Singer Died : प्रसिद्ध आदिवासी गायक बाळा रतन दिवे यांचा मृत्यू title=

ठाणे : ठाण्यातल्या शहापूर तालुक्यातील 'आग पोरी तू स्वप्नात ये ना' फेम प्रसिद्ध आदिवासी गायक बाळा रतन दिवे (Bala Ratan Dive) उर्फ बाळ्या सिंगर (Balya Singer Died) यांचा मृत्यू झाला आहे. मासेमारी करताना पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र नक्की मृत्यूचं कारण समजलेलं नाही. बाळा यांच्या पश्चात  4 मुलं आणि पत्नी असा परिवार आहे. (aga pori tu sapnat yena fame singer bala ratan dive aka balya singer died) 

बाळा गुरुवारी रात्री सोनुभाऊ बसंवत कॉलेज जवळील पळसपाडा इथल्या नदीवर ते मासेमारीसाठी गेले होते. सकाळी त्यांचा मृतददेह नदीकिनारी तरंगताना आढळला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू कसा होऊ शकतो, अशी शंकाही नेटकऱ्यांनी व्यक्त केलीय. 

बाळा जरी आमच्यात नसला तरी ते कायम गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या मनात राहतील, अशा काही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान आदिवासी समाजातील बाळ्या सिंगरने मासेमारी करत आपल्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. बाळ्या सिंगर 'आग पोरी तू स्वप्नात ये ना' (aga pori tu sapnat yena) या गाण्यामुळे घराघरात पोहचला.