अजित पवार यांचे रोखठोक मत, 'इतर मंत्री काय म्हटले हे सांगायला मी मोकळा नाही'

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच परखड बोलत असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.  

Updated: Jan 4, 2022, 02:32 PM IST
अजित पवार यांचे रोखठोक मत, 'इतर मंत्री काय म्हटले हे सांगायला मी मोकळा नाही' title=
संग्रहित छाया

पुणे : Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच परखड बोलत असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्धी सहकारी बँक निवडणुकीत दगाफटा होईल, याची भीती वाटत होती. ती खरी ठरली आहे. मला एका जागेबाबत शंका होतीच. काही ठिकाणी मतं विभागली, असे ते म्हणाले. दरम्यान, एका प्रश्नावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले. मंत्री जितेंद्र आव्हाड काय म्हटले किंवा इतर मंत्री काय म्हटले हे सांगायला मी मोकळा नाही. माझी मत मी स्पष्ट मांडत असतो, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Pune District Bank Election and Jitendra Awhad OBC Reservations Commentary)

पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, अजितदादांना धक्का

पुणे जिल्हा बँक निवडणुकीबाबत त्यांनी भाष्य केले. आमची जागा एका ठिकाणी आली नाही. आमचे कार्यकर्ते कमी पडले. मात्र, अनेक ठिकाणी मताधिक्य जास्त आहे. अनेक ठिकाणी आम्ही त्याचा विचार करु. जिल्हा बँक आली, त्यात एक जागा गेली आमचे 13 ठिकाणीं मतदान होतं. त्यात 8 ठिकाणी मागे राहिलो. बाकी सर्वच जागा चांगल्या मतांनी आल्या आहेत. निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन, असे अजित पवार म्हणाले.
 
ओबीसी मुद्दा महाराष्ट्र पुरता राहिलेला नाही, त्यामुळे कोणीही राजकारण करू नये, असे सांगत अजित पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाड काय म्हटले किंवा इतर मंत्री काय म्हटले हे सांगायला मी मोकळा नाही, माझी मत मी स्पष्ट मांडत असतो. 

पुण्यातील आजच्या बैठकीवर त्यांनी सांगितले की, कोरोना बैठकीत सगळे मुद्दे पाहून निर्णय घेऊ. काही ठिकाणी वर्क फॉर्म होम केले आहे तसे काहीबाबत चर्चा करून पाहून ठरवू. जिथं नागरिक हित सांभाळून अन नागरिकांच्या चांगल्या करता निर्णय घेऊ. एकमताने निर्णय घेतो मी, असे सांगितले.

सर्वानी नियमांच पालन केले पाहिजे. आपण दंड ही वसूल केला आहे. मास्क  घातला पाहिजे. सर्व सेवा दिल्या पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काहीबाबतीत आणि बेडबाबत चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. मुख्यमंत्री अन इतरांची इच्छा आहे की सर्वांनी खालच्या लेव्हल एकत्र लढलो पाहिजे. शिवाजीराव आढळराव बोलले असते तर बोललो असतो मी. काही भागात राजकीय परिस्थिती वेगळी असते त्यामुळे काही ठिकाणी होतं.

सहकारामध्ये पक्षाच्या बाजूने कधीच निवडणूका होत नाहीत. बाकी ठिकाणी चिन्ह असतात. सातारामध्ये पक्ष म्हणून निवडणूक लढली नव्हती. मुबंई बँकेवर अनेक जण आहेत, ती निवडणूक पक्षविरहीतच होते, अजित पवार यांनी भाष्य करताना सांगितले.