VIDEO : कर्मचाऱ्यांकडून मसाज करवून घेणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ वायरल

अकोल्यातील समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ लिपिकावर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: Feb 8, 2018, 10:59 PM IST
VIDEO : कर्मचाऱ्यांकडून मसाज करवून घेणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ वायरल

अकोला : अकोल्यातील समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ लिपिकावर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अश्लील वर्तन 

निरंजन खंडारे असं या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. निरंजन खंडारे हा महिला कर्मचाऱ्यांच्या समोर कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मसाज करवून घेत होता. तसंच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला अश्लील हावभाव करुन चिडवत असल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्यानं केलीय. 

खंडारे हा आस्थापना विभागात असल्याने निलंबन करण्याची धमकी देत असल्याची तक्रारही या महिलेने सीटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलीय.

कर्मचारी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी निरंजन खंडारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी निरंजनला अटक केलीय.