दप्तरात लिपस्टिक आढळल्यानं विद्यार्थीनीला मारहाण

दप्तरामध्ये लिपस्टिक आढळल्यानं अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने जबर मारहाण 

Updated: Jan 11, 2020, 08:51 AM IST
दप्तरात लिपस्टिक आढळल्यानं विद्यार्थीनीला मारहाण  title=

अमरावती : अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमध्ये प्रबोधन विद्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दप्तरामध्ये लिपस्टिक आढळल्यानं अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने जबर मारहाण केली आहे. शिक्षक नरेंद्र गोंडाने या शिक्षकाने ही मारहाण केली आहे. त्यामुळे या शिक्षकाविरुद्ध परिसरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

नरेंद्र गोंडाने याच्याविरुद्ध स्थानिक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दप्तरात लिपस्टिक सापडल्याच्या कारणावरून रूळ, आणि लोखंडी पाईनं विद्यार्थिनीला मारहाण करण्यात आली. शिक्षकानं एवढी मारहाण केली की त्या विद्यार्थिनीच्या पायावर वळ उठलेत. या मारहाणीच्या धक्कातून विद्यार्थीनी सावरली नव्हती. शिक्षकावर कठोर कारवाई करा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.