अमरावती : गाडी चालवताना मोबाईल वापरणं चुकीचं आहे असं सांगितलं जातं. गाडी चालवताना मोबाईल वापरणाऱ्यावर दंड किंवा कारवाई केली जाते. अशी परिस्थिती असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एसटी चालकच नियम धाब्यावर बसवतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एसटी चालकाने एका हाताने एसटीचं स्टेअरिंग पकडलं तर दुसऱ्या हाताने मोबाईलवर बोलता होता. अमरावतीच्या एसटी बस चालवताना, मोबाईलवर बोलत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
एका प्रवाशाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला होता. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं गुन्हा असताना,या कर्मचा-यावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष आहे.
यापूर्वी देखील अशा प्रकारे प्रवाशांच्या जीव धोक्यात घालण्याचा प्रकार समोर आला होता. आता पुन्हा एकदा एसटी चालकाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या कर्मचा-यावर कारवाई काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.