'समृद्धी'नं पळवलं गावकऱ्यांच्या तोंडचं पाणी

अस्तित्वासाठी लढणाऱ्या इथल्या गावकऱ्यांनी  झी हेल्पलाईनचिही मदत घेतली...

Updated: Apr 21, 2018, 09:10 PM IST
'समृद्धी'नं पळवलं गावकऱ्यांच्या तोंडचं पाणी title=

राजेश सोनोने झी मीडिया अमरावती : समृद्धी महामार्गान अनेक शेतकऱ्यांची जमिन संपादित केलीये... त्यामुळे या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय.. मात्र अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गान चक्क मंगरुळ चव्हाळा या गावातल्या गावकऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळवलंय... अस्तित्वासाठी लढणाऱ्या इथल्या गावकऱ्यांनी आता झी हेल्पलाईनचिही मदत घेतली...

 गावाचा पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर 

अमरावतीतल्या नांदगाव खण्डेश्वर तालुक्यातील हे मंगरूळ चव्हाळा गाव... या गावाची लोकसख्या साजेचार हजाराच्या आसपास... या गावाच्या वेशीवरून  नागपूर - मुंबई हा  समृद्धी महामार्गात जाणार आहे आणि याच महामार्गात गावाला पाणी पुरवठा करणारी एकमेव विहीर जाणार आहे... दरवर्षी उन्हाळ्यात गावात भीषण पाणी टंचाई निर्माण होते.. त्यामुळे  ग्रामपंचायतीने गावालगतच्या शोभाताई शिरभाते यांच्या शेतातील ही  विहीर अधिग्रहित केली आहे.. याच विहिरीतून गेल्या आठ वर्षांपासून गावाला पाणी पुरवठा केला जातोय.. मात्र आता हि विहीर प्रस्तावित समृद्धी महामार्गात जाणार आहे.. त्यामुळे गावाचा पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर होणार आहे. जिल्हा प्रशासनाने दुसरी विहीर बांधण्याकरिता नवीन जागा शोधली आहे.. मात्र गावात पाण्याचे स्रोत कमी असल्यानं नव्या विहिरीला मुबलक पाणी लागण्याची शक्यता ॆफारच कमी आहे... त्यामुळे हीच विहीर कायम ठेवण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन  गावकर्यांनी जिल्हाधिकारी याना दिले

 पाण्याचे स्रोत उन्हाळ्यात दरवर्षी आतात

गावलगतच्या या विहिरी मधून ग्रामपंचायतीने पाच लाख  रुपये खर्च करून पाईप लाईन टाकली आहे.. गावात जे पाण्याचे स्रोत आहेत ते दरवर्षी उन्हाळ्यात आटून  जातात..  त्यामुळे या विहिरीवर एक पूल बांधण्यात यावा किंवा व्हा हि विहीर वाचवण्यासाठी उपाय योजना करावी अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे 

गावकऱ्यानी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली

प्रयत्न करुनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यानी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली... ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम तातडीनं गावात दाखल झाली... सध्याच्या स्थितीत आठवड्यातून केवळ एकदाच या विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा होतो.. गावात पाण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्यानं गावकरी चिंतेत होते.. गावक-यांची ही समस्या झी हेल्पलाईनच्या टीमनं अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षापुढे मांडली. जिल्हा परिषदेच्या आमसभेत यासंदर्भात ठराव मांडला असून त्या द्वारे शासनाला विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यातील नांदगावखंडेश्वर हा तालुका कायमस्वरूपी दुष्काळ ग्रस्त .. या तालुक्यांत कुठलेच मोठे धरण नसल्याने या भागात पाण्याची टंचाई असते अशा परिस्थितीत सुरू असलेला पाण्याचा स्त्रोत बंद करणे संयुक्तिक नाही.. विकास कामे झालीच पाहिजे मात्र ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या इतरही सुविधांकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे.. त्यामुळे मंगरूळ चव्हाळा गावातील नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्न सुटत नाही तो पर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील..