close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निनावी फोनमुळे अघोरी प्रकार उघड, अजगराची मरण यातनांतून सुटका

राजापूर तालुक्यात अजगर जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर हा रत्नागिरीतील दुसरा प्रकार

Updated: Dec 5, 2018, 05:23 PM IST
निनावी फोनमुळे अघोरी प्रकार उघड, अजगराची मरण यातनांतून सुटका

रत्नागिरी : रत्नागिरीत जिवंत अजगराचा अमानुष छळ केल्याची घटना उघड झालीय. रत्नागिरीजवळ मिरजोळे जांभूळफाटा इथल्या जंगलात काही दिवसांपासून या अजगराला कित्येक दिवस दोऱ्यांनी झाडांना बांधून ठेवण्यात आलं होतं. या अजगराच्या मानेभोवती दोरीचा फास आवळला होता. अजगराच्या तोंडावर मारून त्याला जखमी करण्यात आलं होतं. १० ते १२ फूट लांब असलेल्या अजगराला असह्य वेदना होत होत्या. अखेर सर्पमित्रांना आलेल्या निनावी फोननंतर अजगराची या मरणयातनातून सुटका करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अजगर जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर हा रत्नागिरीतील दुसरा प्रकार पुढे आला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.