एवढा माज येतो कुठून? 75 हजार रुपयांची दारु ढोसून बेदरकारपणे कार चालवत घेतला दोघांचा बळी

पुणे पोलीस आयुक्तांच्या बडतर्फीच्या मागणी सोबतच या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधी पक्षांनी केली. तर, यावर राजकारण न करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

Updated: May 22, 2024, 11:10 PM IST
एवढा माज येतो कुठून? 75 हजार रुपयांची दारु ढोसून बेदरकारपणे कार चालवत घेतला दोघांचा बळी  title=

Pune Accident News : पुण्यात पोर्शे कारने दोघांना चिरडलं, ज्यात दोघांचा मृत्यू झाला.एक बड्या बापाचा लाडाचा पोरगा. 75 हजार रुपयांची दारु ढोसून बेदरकारपणे कार चालवत दोघांचा बळी घेतो  याची चिड पुणेकरांमध्येच नाही तर देशवासियांमध्येही आहे.. त्याने ज्या दोघांना आपल्या कारखाली चिरडलं, त्यांच्या पालकांना न्याय मिळणार का याकडेच सर्वांचं लक्ष आहे. 

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालला 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. त्याच्यासोबत पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकरलाही 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. सरकारी वकीलांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होता. त्याचबरोबर गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल फरार का झाले? असा सवालही सरकारी वकीलांनी विचारलाय. शिवाजी नगर कोर्टात तिघांनाही हजर करण्यात आलं होतं.

मुलगा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचं लायसन्स नाही, हे माहिती असतानाही मुलाला कार चालवायला दिल्याचा ठपका विशाल अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आलाय. अल्पवयीन मुलाला विना नंबर प्लेट कार चालवायला दिली. मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं  मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं.

याप्रकरणी वकील असीम सरोदे यांनीही न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.पुणे कार अपघात प्रकरणातल्या आरोपींवर कोर्टाबाहेर शाईफेक करण्यात आली. आरोपीचे वडील विशाल अग्रवालला कोर्टात हजर करत असताना त्याच्या अंगावर शाई फेकली गेली. वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केलीय. पुण्यातल्या कार अपघातामध्ये दोघा निष्पापांचा बळी गेला यावरुन वंदे मातरम संघटना आक्रमक झालीय.. आरोपी विशाल अग्रवाल याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करा.. त्याने मुलाला कार चालवायला का दिली.. दारु पिऊन गाडी का चालवली असे संतप्त सवालही वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत.

कोर्टात झालेला युक्तीवाद

कारची नोंदणी का केलेली नाही? कागदपत्रे सादर करावीत
मुलाला पबमध्ये जाण्याची संमती दिली
मुलाला किती पैसे आणि डेबिट, क्रेडिट कार्ड दिले?
ब्लॅक पबमध्ये कुणाच्या मेंबरशिपवर अल्पवयीन मुलाला प्रवेश?
विशाल अग्रवाल फरार का झाले? 
एकच मोबाईल सापडला, बाकीचे मोबाईल कुठे आहेत? ते हस्तगत करायचे आहेत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.