TET परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी, अश्विनीकुमारला 5 कोटी तर या अधिकाऱ्यांनी लाटला इतका मलिदा

TET Exam Scam : टीईटी परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी. शिक्षक पात्रता परीक्षामध्ये (TET Exam) दलालांकडून अश्विनीकुमार याला पाच कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. तर काही अधिकाऱ्यांनी लाखो रुपये लाटले आहेत.

Updated: Feb 17, 2022, 08:54 AM IST
TET परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी, अश्विनीकुमारला 5 कोटी तर या अधिकाऱ्यांनी लाटला इतका मलिदा  title=
संग्रहित छाया

पुणे : TET Exam Scam : टीईटी परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी. शिक्षक पात्रता परीक्षामध्ये (TET Exam) दलालांकडून अश्विनीकुमार याला पाच कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. डॉ. देशमुख आणि सावरीकर यांनी दलालांना पाच कोटी 37 लाख रुपये अश्विनीकुमार यांना देण्यास सांगितले, असे आता पुढे आले आहे. (Inquiry : Ashwini Kumar was paid Rs 5 crore by the brokers in the Teacher Eligibility Test)

जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा तत्कालीन संचालक अश्विनीकुमार शिवकुमार याला पाच कोटी रुपये मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जी. ए. टेक्नॉलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी गैरव्यवहार प्रकरणात गुंतलेल्या दलालांना अश्विनीकुमारला पाच कोटी 37 लाख रुपये देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.

संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना अटक करण्यात आली होती. हरकळ यांनी दलालांकडून पैसे जमा केले होते. अश्विनीकुमार याने दोन कोटी रुपये जी. ए. टेक्नोलॉजीसचा संस्थापक गणेशन यांना दिले तर 30 लाख रुपये राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे याला आणि परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे याला 20 लाख रुपये दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.