मुसलमान म्हणून सिकंदरसोबत... कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

Aslam Kazi talk on sikandar shaikh vs Mahendra gaikwad Maharashtra kesari 2023 : सिकंदर शेख हा मुसलमान असल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला अशा उघडपणे चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. अशातच यावर कुस्ती सम्राट अस्लम काझी यांनी या वादग्रस्त कुस्तीबाबत केलेल्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.

Updated: Jan 21, 2023, 09:31 PM IST
मुसलमान म्हणून सिकंदरसोबत... कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ! title=

Aslam Kazi on sikandar shaikh Kusti 2023 : महाराष्ट्रातील मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (Maharashtra kesari 2023) यंदा वादग्रस्त ठरली. सेमी फायनलमध्ये झालेल्या सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड (Sikandar Shaikh vs Mahendra gaikwad) यांच्यातील कुस्तीमध्ये दिला गेलेल्या निर्णयावर टीका झाली. कुस्ती चांगली रंगात आली होती दुसऱ्या सत्रामध्ये महेंद्रने टाकलेला बाहेरची टांग डाव आणि त्यानंतर बदललेला सामना. महेंद्रला देण्यात आलेल्या 4 गुणांमुळे मोठा वाद झाला, खुद्द सिकंदरनेही पंचांच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली. सिकंदर शेख हा मुसलमान असल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला अशा उघडपणे चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. अशातच यावर कुस्ती सम्राट अस्लम काझी यांनी या वादग्रस्त कुस्तीबाबत केलेल्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. (Aslam Kazi talk on sikandar shaikh vs Mahendra gaikwad Maharashtra kesari 2023 latest marathi News)

सिकंदर आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील झालेल्या कुस्तीच्या सामन्यात पक्षपातीपणा झाला असं अनेकांच मत आहे. तसं पाहायला गेलं तर हा सामना चालू झाल्यापासून लढत एकदम अटीतटीची चालू होती. महेंद्रने टांग डाव टाकताना असं दिसून आलं की सिकंदर हा एक भूजावर पडला याचे त्याला पंचांनी 4 गुण दिले. यावेळी सिकंदर शेखच्या कोचने चॅलेंज घेतलं त्यावर निर्णय देताना ज्युरींनी गडबड केली असं माझं वैयक्तिक मत असून हा निर्णय एका बाजूने घेण्यात आला, असं अस्लम काझी यांनी म्हटलं आहे. 

हा निर्णय घेताना चारही बाजूने तपास करायला हवा होता. त्यावेळी सिकंदरच्या कोचला चॅलेंज घेतल्यावर ओढत बाजूला नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे या प्रकरणाला जास्तच गालबोट लागलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पंचांशी बोललो तर त्यांचंदेखील म्हणणं आहे की महेंद्रला 2 तर सिकंदरला 1 गुण द्यायला हवा होता, त्यामुळे दोन गुणांची पार्शलिटी झाली. पण ती जाणीवपूर्वक नाही तर अनावधानाने किंवा गडबडीत झालेली चूक असल्याचं अस्लम काझी म्हणाले.

काय म्हणाला होता सिकंदर?  
यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी मी पूर्ण तयारीने गेलो होतो. नक्कीच महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली असती. मात्र जे काही घडलं हे माझ्यासोबतच नाहीतर इतरांसोबत नाही झालं पाहिजे. मी गेले दोन दिवस नाराज होता मात्र त्यामुळे फोन उचलले नव्हते. पुढच्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीसाठी मी पूर्ण तयारीने उतरणार असल्याचं सिकंदर म्हणाला.