औरंगाबाद पालिकेने व्यापारांवर लादला 'कचरा कर'

 कचऱ्यासाठी आता औरंगाबादकरांना पैसे मोजावे लागणार आहेत. 

Updated: Aug 6, 2018, 04:46 PM IST

औरंगाबाद : औरंगाबादेत आता कचऱ्यावरही कर लागणार आहे, तुमचा जो कचरा महापालिका उचलते त्या कचऱ्यासाठी आता औरंगाबादकरांना पैसे मोजावे लागणार आहेत.  छोट्या व्यापाऱ्यांना कचऱ्यापोटी २ रुपये ते १० रुपये रोज तर मोठ्या व्यापाऱ्यांना ३०  ते १०० रुपये  रोज द्यावे लागणार आहेत.  व्यापारी संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतलाय. 

लोकांकडून नाराजी  

एकीकडे कचरा प्रश्न सोडवण्यात महापालिका अपयशी ठरतेय. तर दुसरीकडे  कचरा उचलण्यासाठी महापालिका लोकांकडूनच कर वसूल करणार असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान जीएसटी प्रणाली लागू झाल्यावर स्थनिक स्वराज्य संस्थाना असे कर लावण्याचे अधिकारच मुळात निघून गेले आहेत. त्यामुळे आता हा कर नेमका कसा लावण्यात येतोय याबद्दलही साशंकता उत्पन्न झाली आहे.