प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : खासदार हिना गावित यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे लोकसभेतही पडसाद उमटले. हल्लेखोरांना तातडीनं पकडावं आणि पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी हिना गावित यांनी लोकसभेत केली. यावेळी त्यांनी हल्ल्याचे छायाचित्रही लोकसभा अध्यक्षांना दाखवली. तसंच पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप हिना गावितांनी केला.
तर दुसरीकडे या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असुन नंदुरबार शहरात हजारो आदिवासी बांधवानी जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला. हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करून हल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
या मोर्चादरम्यान रस्त्या-रस्त्यांवर टायर पेटवून वाहतूक रोखण्यात आली. कालच्या हल्ल्याप्रकरणी डॉ. हीना गावीत यांनी पोलीसांत स्वता फीर्याद दिली आहे. २०-२५ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांची विशेष पथकं संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.