राज्यात पेटलेला कचरा प्रश्न दोन आयुक्तांना भोवला

औरंगाबाद कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आलीय. 

Jaywant Patil Updated: Mar 16, 2018, 10:43 PM IST
राज्यात पेटलेला कचरा प्रश्न दोन आयुक्तांना भोवला title=

औरंगाबाद : राज्यात पेटलेला कचरा प्रश्न दोन आयुक्तांना भोवलाय. औरंगाबाद कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आलीय. तर कल्याण डोंबिवलीतल्या कचराही महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना भोवलाय. त्यांचीही बदली करण्यात आलीय. 

आजूबाजूच्या गावांमध्ये संघर्ष पेटला

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून कच-याचा प्रश्न पेटलेला होता. शहरातल्या कच-याचं नियोजन न झाल्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये संघर्ष पेटला होता. गावक-यांच्या आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. 

पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनाही सक्तीची रजा

पोलिसांनीही मिटमिटा गावात घुसून गावक-यांच्या घरांवर दगडफेक केली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनाही कालच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. 

तर कल्याणमध्ये गेल्या दिवसांपासून डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीमुळे कच-याचा प्रश्न पेटला होता. महापौरांनी या समस्येचं खापर आयुक्तांवर फोडलं होतं. त्यामुळे वेलरासू यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतून उचलबांगडी करण्यात आलीय.