औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कचऱ्याचा तिढा कायम आहे. आज कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडीले, आयुक्त दीपक मुगलीकर मुंबईत आलेत.
कचराप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी आज हे दोघे मुंबईला आलेत. नारगावातील नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढिग कायम आहेत.
दुसरीकडे, औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य वाढत चाललं आहे. औरंगाबाद महापालिकेनेही रस्त्यावर लोकांनी मास्क वापरावेत असं आवाहन केलं आहे.
इतर ठिकाणी कुठे कचरा टाकण्यासाठी जागा मिळेल का? याची चाचपणी महापालिकेकडून सुरू आहे, मात्र महापालिकेला अजून कोणतीही जागा शोधता आलेली नाही. तर दुसरीकडे संबंधित गावकरी याबाबतीत महापालिकेवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.