स्टेप बाय स्टेप क्लासच्या अविनाश चव्हाण यांच्या हत्येचं गूढ उकललं

लातूरमध्ये स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्ये प्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

Updated: Jun 26, 2018, 07:33 PM IST

लातूर : लातूरमध्ये स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्ये प्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून हत्येसाठी त्यांना २० लाखांची सुपारी देण्यात आली होती. कुमार मॅथ्स क्लासेसचे प्रमुख चंदनकुमार शर्मा यांनी ही हत्येची सुपारी दिली होती. व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या करण्यात आली. चंदनकुमार शर्मा, करण, अमोल शेंडगे, महेशकुमार रेड्डी आणि शरद घुमे अशा पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रिव्हॉल्वर आणि १३ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. ३६ तासात लातूर पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलं. रविवारी मध्यरात्री अविनाश चव्हाण यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.