मुंबईत मॉर्निंग वॉकनं बिघडू शकतं आरोग्य! सरकारकडून खबरदारीचा इशारा

तुम्ही तुमच्या आरोग्याच्या हितासाठी मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकला जाता का? पण आता तुम्हाला हा वॉक बंद करावा लागू शकतो. राज्य सरकारकडून यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Updated: Nov 6, 2023, 01:31 PM IST
मुंबईत मॉर्निंग वॉकनं बिघडू शकतं आरोग्य! सरकारकडून खबरदारीचा इशारा title=

Avoid Morning Walk: तुम्ही तुमच्या आरोग्याच्या हितासाठी मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकला जाता का? पण आता तुम्हाला हा वॉक बंद करावा लागू शकतो. राज्य सरकारकडून यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबई आणि लगतच्या 17 मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

शहरांतील धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या वायुप्रदुषणामुळे सरकारकडून खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे.  मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी घराबाहेर चालणं टाळा, सकाळी आणि संध्याकाळी घरचे दरवाजे खिडक्या उघडू नका, दुपारी 12 ते  बाहेर पडू नका असा सल्ला देण्यात आला आहे. 

नागरिकांनी मास्क वापरण्याला प्राधान्य द्यावं, लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळणे टाळा, दिवाळीत फटाके फोडण टाळण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.

पुढील जिल्ह्यात विशेष खबरदारीच्या सूचना -

सोलापूर
मुंबई
नाशिक
अमरावती
सांगली
जळगाव
जालना
कोल्हापूर
लातूर
अकोला
बदलापूर
उल्हासनगर
औरंगाबाद
पुणे
नागपूर
चंद्रपूर
नवी मुंबई

पालिकेकडून दंडात्मक कारवाई

दुसरीकडे मुंबई महानगरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार बांधकाम - पाडकामाचा राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही महानगरपालिकेने सक्त मोहीम हाती घेतली आहे. 

 या अंतर्गत 3 ते 5 नोव्हेंबर 2023 या 3 दिवसात एकूण 4 लाख 71 हजार 692 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.