सोलापूर : 'झी 24 तास'नं बातमी दाखवल्यानंतर सोलापूरातील करमाळा येथील बाळूमामांचे (Balumama) स्वयंघोषित अवतार मनोहर भोसले हे आश्रमातून गायब झाले आहेत. अमावस्या आणि पौर्णिमेला चमत्कार करुन भक्तांना ठगणाऱ्या मनोहन भोसलेंना भेटण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितिचे सदस्य गेले असता ही बाब आढळली.
अंनिस आणि बाळूमामांच्या भक्तांनी केलेला हा आरोप या प्रकरणाला आणखी एक वळम देऊन गेला आहे.
बाळूमामांचा वारस बनून कोण करु पाहतंय स्वत:चं चांगभलं?
नेमकं काय घडलं होतं?
संत बाळूमामा म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. त्यांचं मूळ स्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपुरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र आता त्यांच्या नावानं एका नव्या बाबानं बस्तान मांडल्याचा आरोप होतोय. मनोहर भोसले असं या बाबाचं नाव. करमाळा तालुक्यातल्या उंदरगावचा मनोहर भोसले स्वत:ला बाळूमामांचा वंशज आणि शिष्य म्हणून बनाव करत असल्याचा आरोप कोल्हापूरच्या आदमापूर ग्रामपंचायत आणि बाळूमामा देवालय़ ट्रस्टनं केला होता.
बाळूमामांनी समाधी घेतलेल्या आदमापूरच्या ग्रामस्थांनी या भोसलेबाबाविरोधात जोरदार मोहीम सुरु केली. यातच बाळूमामांचे कुणीही वंशज नसल्यामुळं त्यामुळे मनोहर भोसले आणि बाळूमामांचा कोणताही संबंध नसल्याचा ठरावच ग्रामपंचायतीनं केला होता. मनोहर भोसलेविरोधात अनेक पुरावेही गोळा केले होते.