Thane Traffic Police : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण थर्टी फस्टच्या पार्टीचा बेत आखतात. 31 डिसेंबरच्या रात्री दारुच्या दुकानांवर झुंबड उडते. तर, सर्व बार हाऊसफुल होतात. मद्यधुंद अवस्थेत असलेले तळीराम घालतात. यामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. यामुळे मद्य धुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी. ठाणे वाहतूक पोलिसांनी तशा प्रकारचे आवाहन केले आहे.
31 डिसेंबरला अनेक तळीराम हे शहरांमध्ये हैदोस घालताना पाहायला मिळतात. यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची देखील चिन्ह असतात. या अनुषंगाने ठाणे वाहतूक शाखा आतापासूनच न्यू इयर सेलिब्रेशन दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पावलं उचलताना पाहायला मिळत आहे. ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी बार चालकांसोबत आज बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केलं.
31 डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत बार सुरू असल्याने अती मद्य धुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी असे आवाहन वाहतूक पोलीस उपयुक्त यांनी केले. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचा देखील वाहतूक पोलीस उपायुक्त त्यांनी सांगितले. तर, एखादा ग्राहक अति मध्य सेवन केलेला असेल तर त्या ग्राहकाला घरी सोडण्यात यावं वाहतूक कोंडी होणार नाही त्याचप्रमाणे पार्किंग मुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं बार मालकांचा म्हणणं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोणतीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते याच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पादचाऱ्यांना काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेले झेब्रा क्रॉसिंग अस्तित्वात आहेत. हेच काळे आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे कालांतराने दिसेनासे होतात. यामुळेच ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखेच्या वतीने हेच पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग लाल आणि पांढऱ्या रंगाचे करण्याचा निर्णय घेतला आहे. तीनहात नाका परिसरात याची चाचणी यशस्वी झाली असून नागरिक पेडेस्ट्रीयन क्रॉसिंगचा वापर करताना देखील दिसून येत आहेत. तर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायंकाळी रहदारी वेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकांना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सूचना करत वाहतुकीचे नियोजन देखील लावण्यात येत आहे. जेणेकरून ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी टाळली जाऊ शकते. या संपूर्ण उपक्रमाचा आता मोठ्या प्रमाणात फायदा वाहतूक शाखेला होत असल्याचं ठाणे वाहतूक शाखा उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले.