Maharashtra Politics : भाजप आणि शिंदे गट यांच्यासह अजित पवार यांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला आहे. याच महायुतीत आता वादाची ठिणगी पडली आहे. भाजप आणि शिंदे गटाचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर, दुसरीकडे महायुतीत सहभागी असलेले अपक्ष आमदार बच्चू आमदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगलेय. बच्चू कडू महायुतीमधून बाहरे पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू महायुती सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या अमरावती दौऱ्यावर आहेत. याच दौ-यात शरद पवार आणि बच्चू कडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट होणार आहे.. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याने चर्चांना उधाण आलंय.. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू उमेदवार देणार आहेत. कडू यांचे निकटवर्तीय रवींद्र वैद्य प्रहारचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होणार असली तरी बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बच्चू कडूंचं मविआत स्वागत आहे असं वक्तव्य काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केलंय.
बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असतील तर स्वागत असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या. शरद पवार आणि बच्चू कडू भेट होत असेल तर चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. अमरावती जिल्हा दौ-यात पवार उद्या बच्चू कडूंची भेट घेणार आहेत. या भेटीबाबत यशोमती ठाकूर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा भाजप आणि शिंदे गटाचा आरोप आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केलीय. तब्बल 800 कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय. हा 800 कोटी रुपयांचा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात दररोद देवेंद्र फडणवीसांच्या तीन सभा असणार आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस राज्याचा दौराही करणार आहेत. त्यांच्या दौ-याचं वेळापत्रक लवकरच ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत 45 हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे.