प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: हल्ली अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच नुकतीच एक घटना भंडारा (bhandara) तालुक्यात घडल्याची पाहायला मिळाली. लग्नात आलेल्या पाहूण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. लग्न स्वागत सोहळ्यातील अन्नातून सुमारे 200 जणांना विषबाधा होण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सरांडी (sarandi) बुज येथे उघडकीस आला आहे. रात्री भोजन केल्यानंतर काहींना त्रास व्हायला लागला तर अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाल्याने खासगी रुग्णालयासह (private hospital) प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health centre) उपचार करण्यात आले होते. दरम्यान सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल होत उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. (bhandara news 200 people diagnosis with loose motion and vomiting after having food poisoning at wedding reception)
सरांडी येथील मदन नामदेवराव ठाकरे यांच्या मुला विवाह लाखांदुर तालुक्यातील किन्ही येथे पार पडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास या कार्यक्रमात किन्ही, सरांडीसह नजीकच्या गावातील पाहुण्यांनी हजेरी लावली. मात्र, दुसऱ्या सकाळी काहींना उलटी, पोटदुखी, हगवण, मळमळीचा (vomiting) त्रास जाणवू लागला त्यांनी सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयांत धाव घेतली असता उपचारा अंति घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान आरोग्य विभागाचे (health department) पथक गावात दाखल होत सर्व गावकऱ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावातील सात ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान अन्नातुन विषबाधा झाल्याचे पुढे आले आहे.
हेही वाचा - सकाळी उठल्यानंतर 'ही' काम केल्यास लक्ष्मी देवी राहतील प्रसन्न; जाणून घ्या
कधी दुषित जेवण तर कधी पाणी, नुकत्याच घडलेल्या या काही घटना, यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. भोर (bhor) शहरातील वाघजाई नगर आणि पिराचामळा परिसरात पाण्यात अळ्या आढळल्या आहेत. भोर शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या पाण्यात आळ्या आढळून आल्या आहेत. मागील दोन दिवसांपासुन दूषित (polluted water) पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहे. अक्षरशः घरातील हंड्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या लहान लहान आळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे अनेकांना जुलाब, उलट्याचा त्रासही होतोय. शहरातील वाघजाई नगर आणि पिराचामळा परिसरातील नागरिकांना हे बाब निदर्शनास आणली आहे. तात्काळ पालिका प्रशासनाने जलशुद्धी केंद्राची पाहणी करून संपुर्ण जलशुद्धी केंद्र स्वच्छ आणि औषधं फवारणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.