Revas Reddy Highway: मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतच्या सागरी महामार्गाचे भूमीपूजन आज करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. रेवस ते रेडी या सागरी महामार्गाची एकूण लांबी 498 किमी इतकी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा महामार्ग असणार आहे.
रेवस ते रेडी हा महामार्ग कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना जोडतो. कॉलिफॉर्नियाच्या धर्तीवर या सागरी महामार्गाची रचना करण्यात येणार आहे. तसंच, या सागरी महामार्गावरील पुढील सात पुलांचे आज भूमीपूजन करण्यात येणार आहे. या सर्व 7 पुलांची लांबी 26.70 किमी असून एकूण प्रशासकीय मान्यता रु. 7851 कोटी इतकी आहे.
रेवस ते रेड्डी हा महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातून जाणार आहे. तसंच, मुंबईकरांना थेट गोव्याला जाण्यासाठी या महामार्गाचा फायदा होणार आहे. समुद्र किनाऱ्यालगतची शहरे मुख्य रस्त्याशी सोडली जाणार असून मुंबई ते गोवा अंतरही कमी होणार आहे. तसंच, समुद्रा किनाऱ्याजवळून हा महामार्ग जाणार असल्यामुळं पर्यटनाला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे कोकणातील 93 पर्यटकांना हा मार्ग जोडणार आहे.
रेवस-रेडी सागरी किनारा प्रकल्प काम सुरू केल्यानंतर पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हणजेच 2030 पर्यंत प्रवाशांना सागरी किनारा मार्गावरुन प्रवास करता येणार आहे.
1) रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडी वरील पुल
एकूण लांबी : 10.20 किमी.
प्रशासकीय मान्यता : रु. 3057 कोटी
पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पुल)
कामाची मुदत : 3 वर्ष
2)रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडी वरील पुल:
एकूण लांबी : 3.82 कि मी
प्रशासकीय मान्यता रक्कम : 1736 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष
3)दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडी वरील पुल:
एकूण लांबी : 4.31 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : 1315 कोटी.
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष
4)बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पुल :
एकूण लांबी : 1.711 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 408 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष
5)केळशी भागातील केळशी खाडीवरील पुल :
एकूण लांबी : 670 मी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 148 कोटी
पुलाचा प्रकार: बॉक्स गर्डर
कामाची मुदत : 3 वर्ष
6)जयगड खाडीवरील पुल:
एकूण लांबी : 4.40 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 930 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष
7)कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम
एकूण लांबी : 1580 मी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 257 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे