Rs 7015 Crore Project Approved Big Boost To Maharashtra: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासंदर्भात अनेक निर्णय झटपट घेतले जात असल्याचं दिसत आहे. असं असतानाच आता राज्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाला केंद्रातील मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. महाराष्ट्रातील दोन नद्या जोडल्या जाणार असून यासाठी केंद्र सरकारने 7 हजार 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.
फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या मंजुरीचं पत्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य सरकारला दिलं असून हे पत्र फडणवीसांनी शेअर केलं आहे. "वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा माननिय राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. मी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे," असं फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे," असंही फडणवीस पोस्टमध्ये म्हणाले आहेत. तसेच, "सुमारे 7015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे," असं सांगतानाच फडणवीस यांनी, "राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे," असंही नमूद केलं आहे.
वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा मा. राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. मी मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे.
या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ… pic.twitter.com/soMzi8q2TH— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 10, 2024
नार-पार या नाशिक जिल्ह्यामधील पेठ, सुरगाणा तालुक्यांमधील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची 'नार-पार-गिरणा नदी जोड' योजना आहे. यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांना फायदा होणार आहे. यामध्ये कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7 तालुक्यांना याचा फायदा होणार आहे. एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, पाचोरासारख्या तालुक्यांमधील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागालाही या योजनेचा मोठा लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.