पुण्यात तब्बल 12 शाळा अनधिकृत; तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?

Pune Bogus Schools: आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यातील सुयोग्य निर्णय घेण्याइतकं सक्षम व्हावं असं पालकांचं स्वप्न असतं. याची सुरुवात शाळांपासून होते. पण, याच शाळा अनधिकृत असल्या तर? पाहबा धक्कादायक बातमी   

सायली पाटील | Updated: Apr 19, 2023, 11:40 AM IST
पुण्यात तब्बल 12 शाळा अनधिकृत; तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?  title=
big breaking news pune unauthorised schools list revealed latest updates

Bogus Schools List in Pune: आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत जावं, चांगलं शिक्षण व्हावं असं म्हणत मुलांच्या शैक्षणिक आयुष्याच्या दृष्टीनं पालक अनेकदा चांगल्यातील चांगली शाळा निवडण्याच्या प्रयत्नांत असतात. प्रत्येक पालकाचे शाळा निवडण्याचे निकष विविध घटकांवर अवलंबून असतात. पण, पाल्यांचं हित हाच एकमेव हेतू इथं केंद्रस्थानी असतो. पण, पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची स्वप्न यांची राखरांगोळी करणाऱ्या काही शाळांची नावं नुकतीच समोर आली आहेत. शिक्षणाची पंढरी, शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पुणे जिल्ह्यात एक दोन नाही तर तब्बल 12 शाळा अनधिकृत असल्याचं उघडकीस आलं आहे. 'झी २४ तास'नं यापूर्वीही पुण्यातील बोगस शाळांचा मुद्दा उचलून धरला होता आणि आता पुन्हा एकदा या मुद्द्यानं पालकांना आणि प्रशासनाला खडबडून जागं केलं आहे. त्यामुळं तुमची मुलंही या अनधिकृत शाळांमध्ये नाहीत ना, हे आताच पाहून घ्या. 

पुण्यातील अनधिकृत शाळा

अनधिकृत शाळांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातल्या शाळांचा समावेश आहे. झी २४ तासच्या बोगस शाळांच्या बातमीनंतर कारवाई तर करत जिल्हा परिषदेनं काही पावलं उचलली, काही शाळा बंदही झाल्या पण काही मात्र अद्यापही सुरुच होत्या. त्यामुळं या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असं आवाहन पुणे जिल्हा परिषदेनं केलं आहे. 

हेसुद्धा वाचा : School Reopening : शाळा सुरु होण्याची तारीख बदलली; विद्यार्थी- पालकांनो पाहून घ्या नवी तारीख 

 अनधिकृत शाळांची नावं खालीलप्रमाणे... 

  • प्रियांस फ्री प्रायमरी स्कूल कासुर्डी दौंड
  • केके इंटरनॅशनल स्कूल बेटवाडी दौंड
  • जय हिंद पब्लिक स्कूल भोसे खेड
  • मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड
  • अंकुर इंग्लिश स्कूल जांभे मुळशी
  • साई बालाजी पब्लिक स्कूल नेरे मुळशी
  • श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर पुरंदर
  • पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल लोणी काळभोर हवेली
  • कल्पवृक्ष इंग्लिश मीडियम स्कूल क्रिकेट वाडी हवेली
  • क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी हवेली
  • किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल खडकवासला हवेली
  • एस एन बीपी टेक्नो स्कूल बावधन मुळशी

उन्हाळी सुट्टी वाढली? 

दरवर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर साधारण 13 जूनच्या सुमारास शाळा सुरु होतात. पण, यंदाच्या वर्षी मात्र शाळा 15 जूनला सुरु होणार असून, यापुढे शाळा या दिवशीच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळं दोन दिवसांनी का असेना, पण उन्हाळी सुट्टी वाढली याचाच विद्यार्थ्यांनाही आनंद आहे.