1 लाख नाही 50 हजार, 10 नाही 7 वर्ष; SRA सदनिकांबाबत सरकारचा मोठा निर्णय

 SRA योजने अंतर्गत सदनिका प्राप्त झालेल्या सदनिका धराकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. हस्तांतर शुल्क आणि हस्तांतर कालावधीत कपात करण्यात आली आहे. 

Updated: Nov 29, 2023, 04:23 PM IST
1 लाख नाही 50 हजार, 10 नाही 7 वर्ष; SRA सदनिकांबाबत सरकारचा मोठा निर्णय title=

SRA Mumbai : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (Slum Rehabilitation Authority-SRA )  अर्थात  SRA योजने अंतर्गत सदनिका प्राप्त झालेल्या सदनिका धराकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने सदनिका हस्तातंर शुल्क तसेच सदनिका हस्तांतर करण्याच्या कालावधीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सदनिका हस्तांतर शुल्कात 50 टक्क्यांची कपात 

सदनिका हस्तातंर शुल्कात  SRA सदनिका धराकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  सदनिका हस्तांतर करतानाचे शुल्क 50 टक्क्यांनी कमी करण्यचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. सदनिका हस्तांतर करण्यासाठी याआधी 1 लाख रुपयांचे शुल्क भराव लागत होते. आता मात्र, फक्त 50 हजार इकतेच शुल्क भरावे लागणार आहे

सदनिका हस्तांतर करण्यासाठीच्या कालावधीत कपात

सदनिका हस्तांतर करण्यासाठीच्या कालावधीत देखील कपात करण्यात आली आहे. दहा वर्षांचा कालावधी आता फक्त सात वर्षांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

झोपड्या बांधून 2-2 घरं घेणाऱ्यांना चाप

मुंबईत झोपड्या बांधून 2-2 घरं घेणाऱ्यांना चाप बसवणारा निर्णय एसआरने घेतला आहे. अतिरिक्त सदनिका ताब्यात घेऊन प्रकल्पग्रस्तांना देणार असल्याची माहिती एसआरएने दिली. .

वेळेत प्रकल्पाची माहिती न देणा-या बिल्डरांवर महारेराची कारवाई

वेळेत प्रकल्पाची माहिती न देणा-या बिल्डरांवर महारेरानं कारवाई केलीय. 388 प्रकल्पांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. प्रकल्पांची माहिती न दिल्यानं महारेरानं हे पाऊल उचलंलंय. यात एमएमआरडीए क्षेत्रातल्या सर्वाधिक म्हणजे 127 प्रकल्पांचा समावेश आहे. त्याखालोखाल पश्चिम महाराष्ट्रातल्या 120 प्रकल्पांवर कारवाई झालीय. बँक खाती गोठवण्यासह प्रकल्पाची जाहिरात, मार्केटिंग, फ्लॅट विक्रीवरही बंदी घालण्यात आलीय. पहिल्या तीन महिन्यात प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती अपलोड करणं बिल्डर्सना बंधनकारक आहे. महारेराने दोन वेळा नोटीसही दिली होती. अखेर नोटिशीलाही न जुमानणा-या 388 बिल्डरांना हा दणका देण्यात आलाय.