Corona : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर, आज सर्वात मोठी वाढ

कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Updated: Mar 17, 2021, 06:14 PM IST
Corona : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर, आज सर्वात मोठी वाढ title=

कल्याण : कल्याण-डोंबिवली (KDMC) क्षेत्रात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज कोरोनाचे (Corona patient) 593 रुग्ण वाढले आहेत. आजच्या रुग्ण वाढीमुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या चिंता वाढणार आहेत. आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रात 3565 रुग्ण उपचार घेत आहेत. आज 278 जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. (Corona patient Hike)

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर

कल्याण-डोंबिवली पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये सध्या सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंतच दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी आहे. पण वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून आणखी कडक निर्बंध लागू होऊ शकतात.

कल्याण-डोंबिवलीमध्ये 8 नंतर दुकाने बंद होत असली तरी त्याआधी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. लोकांकडून कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

राज्यात देखील कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने होऊ लागला आहे. मुंबईसह पुणे, नागपूर, धुळे या ठिकाणी ही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ठाणे जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

मुंबईत लोकलमध्ये होणारी गर्दी ही वाढत आहे. कोरोनाचे नियम पाळताना निष्काळजीपणा केला जात असल्याने प्रशासनाकडून वारंवार इशारा दिला जात आहे. पण लोकं गांभिर्याने याकडे बघत नाहीयेत. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं जात असलं तरी आता परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे.