आरोग्य संचालनालयाच्या चालक भरतीमध्ये मोठा गोंधळ

आरोग्य संचालनालयाच्या चालक भरतीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. चालक भरतीच्या चाचणीसाठी ज्या उमेदवारांना बोलावण्यात आलं होतं त्या उमेदवारांचं नावच यादीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आज व्यावसायिक चाचणीसाठी पुण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

Updated: Sep 19, 2017, 04:53 PM IST
आरोग्य संचालनालयाच्या चालक भरतीमध्ये मोठा गोंधळ title=

पुणे : आरोग्य संचालनालयाच्या चालक भरतीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. चालक भरतीच्या चाचणीसाठी ज्या उमेदवारांना बोलावण्यात आलं होतं त्या उमेदवारांचं नावच यादीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आज व्यावसायिक चाचणीसाठी पुण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

आरोग्य संचालनालयामार्फत 8 जानेवारी 2017 मध्ये चालक पदासाठी लेखी परिक्षा घेण्यात आली होती. त्यातून पात्र झालेल्या उमेदवारांची आज आरोग्य परिवहन कार्यालयात व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार होती. तशी निवड झाल्याचं पत्रही या उमेदवारांना पाठविण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी यादी बदलण्यात आल्यान उमेदवारांकडून संताप व्यक्त होत आहे.

अनेक उमेदवारांना ऐनवेळी अपात्र केल्याचे एसएमएस आल्यानं एकूणच याभरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. आपल्याला वगळून कमी मार्क असलेल्यांना ऐनवेळी चाचणीसाठी बोलावल्याचा आरोप होतो आहे.