उद्धव ठाकरे खरे की रश्मी ठाकरे? खरं कोण, चौकशी करा! किरीट सोमय्या यांचा सवाल

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूर्ची वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली का? जनतेला कळू दया'

Updated: Feb 18, 2022, 02:55 PM IST
उद्धव ठाकरे खरे की रश्मी ठाकरे? खरं कोण, चौकशी करा!  किरीट सोमय्या यांचा सवाल title=

अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितल्याप्रमाणे आज अलिबागमधल्या (Alibaug) कोर्लई  (Korlai) गावाला भेट दिली. अलिबागच्या कोर्लई गावात पोहचल्यानंतर तिथे हायव्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

कोर्लई ग्रामपंचायतीली आमची व्यवस्थित भेट झाली, मुख्यमंत्री खरे आहेत, की मिसेस मुख्यमंत्री याची स्पष्टता ग्रामपंचायत करु शकलेली नाही. ग्रामपंचायत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिनिधीत्व करतात, असा आरोप सोमय्या  यांनी केला.

ग्रामसेवकांना सर्व कागदपत्र दिली, त्यांनी आम्हाला सांगितलं,  की बंगले अधिकृत होते, आज काही परिस्थिती आहे ती तुम्हाल दोन दिवसात कळवतो असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्रीचे प्रतिनिधी सरपंच म्हणतात बंगले नाहीएत, म्हणून पोलीस स्टेशनला यावं लागलं. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सांगतायत आमचे बंगले आहेत, मग खरं कोण आहे, चौकशी करा, खरं कोण आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रच्या जनतेला मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे,  साडेबारा कोटी जनता मिसेस मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहोत, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सरकारचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहेत, पण हे माफिया सरकार  पैशांसाठी काम करतंय, माफीया सेनेचे मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांचं कंत्राट बोगस संजय राऊतच्या पार्टनरच्या कंपनीला दिले. माफीया सेनेची वरची कमाई बंद होत आहे म्हणून त्यांचा आक्रोश सुरु आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी खूर्ची वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, हे जनतेला कळू द्या असं आवाहन किरीट सोमय्या यांनी केलं.