Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना मोठा धक्का बसलाय, असं म्हटंल तर वावगं ठरणार नाही. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Elections 2024) बिनविरोध होणार का? असा सवाल विचारला जातोय.
काँग्रेसकडून देखील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून (Maharashtra Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. तर अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एवढंच नाही तर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बैठकांचा सपाटा देखील लागू शकतो. तर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा गुजरात मधून राज्यसभेवर जातील.
ब्रेकींगः भाजपनं अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली.
शिवाय मेधा कुलकर्णी आणि डॅा अजित गोपचडे यांनाही उमेदवारी दिलीय.
तर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गुजरात मधून राज्यसभेवर जातील. pic.twitter.com/PBi84B75Ie
— Ramraje Shinde (@ramraje_shinde) February 14, 2024
कसं असेल राज्यसभेचं समीकरण?
काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही. तर भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात. त्याचबरोबर शिंदे गटाकडे 39 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित येऊ शकतो. तर ठाकरे गट आणि शरद पवार गट मिळून एक उमेदवार देण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेच्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातील महाराष्ट्रातील कुमार केतकर (काँग्रेस), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार), अनिल देसाई (ठाकरे गट), प्रकाश जावडेकर (भाजप), नारायण राणे (भाजप), व्ही. मुरलीधरन (भाजपा) यांच्या 6 जागांचाही समावेश आहे.
दरम्यान, देशभरात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, हरियाणा, हिमाचल, राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यसभेच्या निवडणुका आहेत.