'सरकार बलात्का-याला वाचवतंय', चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

 पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सरकार बलात्काऱ्याला वाचवत आहे असा गंभीर आरोप भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

Updated: Feb 27, 2021, 12:56 PM IST
'सरकार बलात्का-याला वाचवतंय', चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप title=

नाशिक: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सरकार बलात्काऱ्याला वाचवत आहे असा गंभीर आरोप भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

सरकार, पोलीस यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही अशी टीका त्यांनी केली. पूजाच्या मोबाईलवर संजय राठोड या नावाने 45 मिस्ड कॉल्स आल्याचा त्यांनी आरोप केला. हा संजय राठोड कोण याचं उत्तर पोलिसांनी द्यावं असं त्या म्हणाल्या.

अरूण राठोडच्या अरूण राठोडच्या कबुलीची दखल का नाही? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. पूजाच्या मृत्यूच्या दिवशी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला असता 9146870100 हा नंबर देण्यात आला. हा नंबर कोणाचा आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता त्यांच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे.

चित्रा वाघ यांच्या पतीऐवजी वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्या या प्रकरणाची आता पोलिसात तक्रार देणार आहेत. संजय राठोड यांची चौकशी करण्याऐवजी या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केला आहे.